Home जळगाव परीक्षा काळात ध्वनीक्षेपकांवर नियंत्रण ठेवावे महापौर सौ. दिपमाला काळे यांचे आवाहन

परीक्षा काळात ध्वनीक्षेपकांवर नियंत्रण ठेवावे महापौर सौ. दिपमाला काळे यांचे आवाहन

परीक्षा काळात ध्वनीक्षेपकांवर नियंत्रण ठेवावे महापौर सौ. दिपमाला काळे यांचे आवाहन

 

 

जळगाव (प्रतिनिधी) – राज्यात सध्या इयत्ता १२ वीची उच्च माध्यमिक परीक्षा सुरू असून दिनांक २० फेब्रुवारी २०२६ पासून इयत्ता १० वीची परीक्षा देखील सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी शांत वातावरण मिळावे यासाठी जळगाव शहरातील ध्वनीक्षेपकांच्या (लाऊड स्पीकर) आवाजावर नियंत्रण ठेवावे, असे आवाहन जळगाव शहर महानगरपालिकेच्या महापौर सौ. दिपमाला काळे यांनी केले आहे.

परीक्षा काळात विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर ग्रंथालये, वाचनालये तसेच घराजवळील परिसरात अभ्यास करत असतात. अशा वेळी मोठ्या आवाजामुळे विद्यार्थ्यांची एकाग्रता भंग होऊन त्यांच्या शैक्षणिक प्रगतीवर विपरीत परिणाम होऊ शकतो.

सध्या जळगाव शहरातील जी.एस. ग्राउंड व सागर पार्क मैदानावर विविध क्रिकेट स्पर्धा सुरू असून सामन्यांचे समालोचन लाऊड स्पीकरवरून मोठ्या आवाजात केले जात आहे. संबंधित मैदानांच्या परिसरात शाळा व महाविद्यालये असल्याने विद्यार्थ्यांना याचा त्रास होत असल्याची नोंद घेण्यात आली आहे.

यामुळे विविध कार्यक्रम व क्रीडा स्पर्धांचे आयोजकांनी परीक्षा कालावधीत ध्वनीक्षेपकांचा आवाज मर्यादित ठेवावा. विशेषतः सायंकाळी ६ वाजल्यानंतर लाऊड स्पीकरचा आवाज कमी ठेवावा व रात्री १० नंतर ध्वनीक्षेपक पूर्णपणे बंद करावेत, असेही महापौरांनी स्पष्ट केले आहे.

विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून सर्व संबंधितांनी सहकार्य करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.

Don`t copy text!