अजितदादा सर्वार्थाने लोकनेते माजी आमदार दिलीप वाघ

अजितदादा सर्वार्थाने लोकनेते माजी आमदार दिलीप वाघ पीटीसीतर्फे स्वर्गीय अजितदादा पवार यांना श्रद्धांजली

 

 

 

पाचोरा( प्रतिनिधी )स्वर्गीय अजितदादा पवार हे महाराष्ट्राचे सर्वार्थाने लोकनेते होते म्हणूनच अजितदादांच्या निधनाने महाराष्ट्राची अपरिमित हानी झाली असून अजितदादांची उणीव महाराष्ट्रा साठी न भरून येणारी आहे असे मत माजी आमदार भाऊसो दिलीप वाघ यांनी अजित दादांच्या शोकसभेत व्यक्त करत त्यांच्या जुन्या स्मृतींना उजाळा दिला. राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचे दिनांक 28 जानेवारी2026 रोजी सकाळी बारामती येथे विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले ,यावेळी संपूर्ण महाराष्ट्र हळहळला .शनिवारी पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेतर्फे श्री.गो.से. हायस्कूल येथील कलादालनात शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी बोलताना दिलीप वाघ यांनी

वाघ परिवार व संस्थेशी अजितदादा यांचेअसलेले स्नेह आणि आपुलकीचे नाते सांगताना अजितदादांच्या कार्यशैलीचा आणि कर्तृत्वाचा आढावा घेतला. यावेळी बोलताना संस्थेचे चेअरमन संजय वाघ यांनी संस्थेच्या विविध कार्यक्रमांना अजितदादांनी दिलेली उपस्थिती आणि मार्गदर्शन दीपस्तंभ ठरले असे सांगत अजितदादा यांनी पक्षीय आणि जातीय राजकारणापेक्षा सामान्य माणसाला आपल्या आयुष्यात केंद्रस्थानी मानल्यामुळेच अवघा महाराष्ट्र अजितदादांच्या निधनामुळे शोकाकुल झाल्याचे सांगितले.कार्यक्रमाच्या सुरवातिला अजितदादांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून आणि दीपप्रज्वलन करून श्रद्धांजली वाहण्यात आली.

यावेळी संस्थेचे शालेय समिती चेअरमन दादासो खलील देशमुख,संचालक प्रा. भागवत महालपुरे, माजी प्राचार्य बी.एन.पाटील,भडगाव विद्यालयाचे प्राचार्य एन. एन. गायकवाड यांनी मनोगत व्यक्त केले.यावेळी व्यासपीठावर संस्थेचे व्हाईस चेअरमन नानासो व्ही.टि. जोशी,श्री. गो से हायस्कूल चे तांत्रिक विभागाचे चेअरमन अण्णासो वासुदेव महाजन उपस्थित होते.

संस्थेचे संचालक सतिष आप्पा चौधरी, योगेश पाटील, डॉ. पितांबर पाटील, जगदीश सोनार,सौ मनीषा पाटील ,शाळेचे मुख्याध्यापक एन आर ठाकरे, श्री एम एम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर शिरीष पाटील,माजी मुख्याध्यापक एस एच पवार, एस एस चौधरी विश्वासराव साळुंखे, सुधीर पाटील उपप्राचार्य वासुदेव वले, संस्थेतील माजी मुख्याध्यापक, संस्थेचे विविध शाखेचे मुख्याध्यापक,उपमुख्याध्यापक ,पर्यवेक्षक, शिक्षक, शिक्षकेतर वृंद उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश कौंडिण्य यांनी केले.