देवगड संस्थानचे महंत भास्करगीरी महाराज यांची विश्वकर्मा देवस्थानला सदिच्छा भेट 
(सुनिल नजन चिफब्युरो स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा)
नगर जिल्ह्यातील
शेवगाव तालुक्यातील वडुले खुर्द येथील रणमले वस्ती येथील भगवान विश्वकर्मा देवस्थानला देवगड संस्थानचे महंत भास्करगीरी महाराज यांनी सदिच्छा भेट दिली.या प्रसंगी महंत भास्करगीरी महाराज यांचा विश्वकर्मा देवस्थानच्या वतीने शिवनाथ महाराज रणमले, कुंडलीक महाराज गोरे,अशोकराव राउत,संतोष शेंडगे,गणेश महाराज रणमले यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.या प्रसंगी महंत भास्करगीरी महाराज यांनी असे प्रतिपादन केले की विष्णू सहस्त्रनामा मध्ये भगवान विश्वकर्मा नामाचा उल्लेख करण्यात आला आहे.भगवान विश्वकर्मा जयंती निमित्त हा उत्सव सुरू आहे.सर्व संतांची आपणावर कृपा आहे.सर्व संत महात्म्यांचे वै.वामनभाऊ,वै.भगवान बाबा,वै.नारायण महाराज,यांचे या परीसरात आशिर्वाद आहेत.आपल्या दुःखावर फुंकर घालणारे साधुसंत देव असतात. भगवंताला मथुरे मधे कंसासारखे, जरासंधा सारखे, राक्षस त्रास देत होते.त्यामुळे भगवान श्रीकृष्ण द्वारका नगरीत राहण्यास गेले होते.तेथे एका रात्रीत द्वारका नगरी विश्वकर्मा महाराजांनी निर्माण करून दिली होती.सर्व देवतांची देवता विश्वकर्मा देवता आहे.वडुले खुर्द येथील भगवान विश्वकर्मा मंदिरात बुद्धीची देवता श्रीगणेश,विद्येची देवता सरस्वती, देवता कलेची विश्वकर्मा आहेत.विश्वकर्मा भगवंतांने आपल्याला सर्व कला शिकवलेल्या आहेत. दुसऱ्यातील दुर्गुण काढून टाकने यालाच कला म्हणतात.सुख हे पचवता आले पाहिजे,दुःख गिळता आले पाहिजे ही कला आपल्याला विश्वकर्मा भगवंतानेच दिली आहे.संतांनी प्रत्येक जातीत अवतार कशासाठी घेतला तर त्या जाती स्थीर ठेवण्यासाठी घेतला. साधुसंताची पुण्यतिथी,जयंती साजरी केली पाहिजे.आपली परंपरा टिकून ठेवली पाहिजे. प्रास्ताविकात मनोगत व्यक्त करताना गणेश महाराज रणमले यांनी सांगितले की येथिल भगवान विश्वकर्मा मंदिराचे २०१८ साली सुनिलगीरी महाराज यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले होते.सन २०२३ साली सुनिलगीरी महाराज यांच्या हस्तेच प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न झाला होता.सौ उमाताई रणमले यांनी महाराजांचे औक्षण केले.या प्रसंगी सुमनबाई गोरे,मालनताई राजगुरू,पोपट आव्हाड,सौ रोहिणीताई शेंडगे, शोभाताई भालेराव यांच्या सह परीसरातील माता भगिनी व पुरुष मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.प्रारंभी गुरूवर्य भास्करगीरी महाराज यांचे रणमले वस्ती वरील भाविकांनी टाळ मृदंगाच्या गजरात दिंडी प्रदक्षिणे द्वारे वाजत गाजत स्वागत केले होते.

























