वडूले खुर्द येथे भगवान विश्वकर्मा जयंतीच्या निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताहात ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यात आयोजन

(सुनिल नजन “चिफब्युरो” स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा)
अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील वडूले खुर्द गावातील रणमले वस्ती येथे भगवान श्री विश्वकर्मा जयंतीच्या शुभ मुहूर्तावर अखंड हरिनाम सप्ताहात ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.या हरीनाम सप्ताहास शनिवार दिनांक 31 जानेवारी रोजी सकाळी प्रारंभ झाला आहे.या काळात दररोज रात्री सात ते नऊ या वेळेत सर्व ह.भ.प.गणेश महाराज रणमले,श्रीहरी महाराज राऊत,कल्याण महाराज शिंदे,उद्धवजी महाराज चन्ने,गणेश महाराज रणमले यांची कीर्तने होणार आहेत. गुरुवार दिनांक ५ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १० ते १२ या वेळेत गुरुवर्य विद्या वाचसपती रविदासजी महाराज शास्त्री (आळंदी देवाची) यांच्या काल्याच्या कीर्तनाने या सोहळ्याची सांगता होणार आहे.शेवटी पांडुरंग विश्वनाथ राऊत,राहणार घेवरी,तालुका शेवगाव,जिल्हा अहिल्यानगर यांच्या काल्याच्या महाप्रसादाच्या पंगतीने या सोहळ्याची सांगता होणार आहे.या सोहळ्यास बुधवार दिनांक ४ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजता देवगडचे परमपूज्य गुरुवर्य भास्करगिरी महाराज यांची सदिच्छा भेट होणार आहे. तरी पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन गणेश महाराज रणमले,शिवनाथ महाराज रणमले आणि समस्त रणमले परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.हा सोहळा “विश्वकर्मा भक्तीधाम” रणमले वस्ती येथे साजरा होत आहे. हा सोहळा गुरुवर्य भास्करगिरी महाराज,महंत सुनील गिरीजी महाराज यांच्या आशीर्वादाने संपन्न होत आहे.

























