मीरी येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण करून माजी मंत्री स्व.”शिवाजीराव कर्डिले साहेब चषक” क्रिकेट स्पर्धेचा उद्घाटन सोहळा संपन्न

मीरी येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण करून माजी मंत्री स्व.”शिवाजीराव कर्डिले साहेब चषक” क्रिकेट स्पर्धेचा उद्घाटन सोहळा संपन्न

 

 

 

(सुनिल नजन “चिफब्युरो” स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा)

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचे अपघाती निधन झाल्याचे कळताच त्यांना तात्काळ श्रद्धांजली अर्पण करून अहिल्या नगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील मीरी येथे माजी मंत्री स्व. शिवाजीराव कर्डिले साहेब चषक क्रिकेट स्पर्धेचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला.या सोहळ्या साठी प्रमुख पाहुणे म्हणून मीरीचे माजी सरपंच संतोष शिंदे,जेष्ठ नेते राजू मामा तागड,चिचोंडीचे सरपंच श्रीकांत आटकर,राजु इनामदार हे आवर्जून उपस्थित होते या सर्वांच्या हस्ते नारळ फोडून या क्रिकेट स्पर्धेस प्रारंभ झाला.मीरी क्रिकेट क्लबने या स्पर्धेचे आयोजन केले आहे.सर्व सामने हे सहा षटकारांचे राहतील असे संयोजकांनी सांगितले आहे.या स्पर्धेत सहभागी झालेल्या विजयी संघांना प्रथम पारितोषिक हे मीरीचे माजी सरपंच संतोष शिंदे यांच्या तर्फे २१००० रूपयाचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.दुसरे पारीतोषीक डॉक्टर नंदकुमार नरसाळे यांच्या वतीने १५००० रूपयाचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.तिसरे पारीतोषिक सुभाष गवळी आणि नितीन शिंदे यांच्या वतीने ११००० रुपयाचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.विजय कोरडे साहेब यांनीही ५००० रूपयाचे पारीतोषीक जाहीर केले आहे.अजूनही ईतर ११ बक्षिसे देण्यात येणार आहेत.या उद्घाटन सोहळ्यासाठी पहील्याच दिवशी एकूण ९ गावातील संघांनी हजेरी लावली होती.या क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यासाठी आदी दाणे,शुभम मोटे,रोहित वाबळे,विकी दारकुंडे,रोहित झाडे,आकाश धनवटे,गणेश खोमणे, शेखर धनवटे, दिपक धनवटे,सागर मोटे,सुरज धनवटे,एकनाथ मिरपगार,सोमा कोरडे,सौरभ सोलाट,वैभव ससे हे उपस्थित होते. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या संघानी शिवाजी मिरपगार, बाबासाहेब गवळी,जाकिर शेख आणि महेंद्र सोलाट यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन मीरी क्रिकेट क्लबच्या वतीने पंच क्रोशीतील क्रिकेट संघांना करण्यात आले आहे.या स्पर्धा राजयोग मंगल कार्यालया शेजारी असलेल्या मैदानात संपन्न होत आहेत.