बाळद येथे विशेष औषध फवारणी मोहीम संपन्न
बाळद | आज दि. 23/12 रोजी सकाळी 10 वाजता गावामध्ये विशेष औषध फवारणी करण्यात आली. गावात डास, मच्छर तसेच किड्या-किरकोळ्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढल्याने आरोग्याच्या दृष्टीने ही फवारणी करण्यात आली.
गेल्या पाच वर्षांच्या कार्यकाळात प्रथमच गावामध्ये औषध फवारणी करण्यात येत असल्याचे ग्रामस्थांनी नमूद केले. मा. नगरसेवक पाचोरा बाळद नगरीचे सुपुत्र शितल दादा सोमवंशी तसेच एम. के. ऍग्रो कल्चरचे संचालक मंगेश सोमवंशी यांनी स्वखर्चाने औषध फवारणीचे यंत्र मागवून गावात फवारणी केली.
शितल दादा सोमवंशी हे नेहमीच गावासाठी विविध योजना आणत असतात. यावेळी मंगेश सोमवंशी यांनी भविष्यातही गावासाठी काहीतरी करून दाखवण्याची इच्छा व्यक्त केली.
या फवारणी मोहिमेची सुरुवात गावचे प्रथम नागरिक सरपंच पती कृष्णा पवार, माजी सरपंच राजेंद्र मोरे, पो. पाटील नितीन पाटील, ग्रामपंचायत सदस्य दर्शन सोमवंशी, माजी उपसरपंच सचिन सोमवंशी, तुळशीदास मोरे, दीपक पवार, गंगाराम सोमवंशी यांच्या हस्ते नारळ फोडून करण्यात आली.
यावेळी शिवसेना कार्यकर्ते समाधान पाटील, बाळू चित्ते, राजेंद्र मोरे, गावातील ग्रामस्थ, ग्रामपंचायत क्लार्क दिगंबर मोरे, वॉटरमन अशोक पाटील, प्रवीण पाटील, दादू आदींनी विशेष सहकार्य केले.
गावाच्या वतीने शितल दादा सोमवंशी व मंगेश सोमवंशी यांचे नंदू मगर यांनी विशेष आभार मानले.























