शेवगावच्या भूमी अभिलेख कार्यालयातील उपअधिक्षक किरण कांगणे यांच्यासाठी 20 हजार रुपयांची लाच घेताना देवेंद्र त्रिंबक फुंदे हा लाचलुचपत च्या जाळ्यात

शेवगावच्या भूमी अभिलेख कार्यालयातील उपअधिक्षक किरण कांगणे यांच्यासाठी 20 हजार रुपयांची लाच घेताना देवेंद्र त्रिंबक फुंदे हा लाचलुचपत च्या जाळ्यात

 

 

 

(सुनिल नजन चिफब्युरो स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा)

अहिल्या नगर जिल्ह्यातील शेवगाव येथील भुमी अभिलेख कार्यालयातील उप अधीक्षक अशोक कांगणे यांच्यासाठी 20 हजार रूपयांची लाच घेताना दलाल देवेंद्र फुंदे याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडून अटक केली आहे.

अहिल्यानगर जिल्ह्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) मोठी कारवाई करत भूमी अभिलेख कार्यालयातील उपअधिक्षक आणि एक खासगी इसमाला 20 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले आहे. ही कारवाई 19 जानेवारी 2026 रोजी शेवगाव तालुक्यात करण्यात आली आहे. तक्रारदार यांच्या नावे असलेल्या शेवगाव येथील सिटी सर्व्हे नंबर 489 मधील जमिनीच्या नोंद प्रक्रियेसाठी उपअधिक्षक किरण अशोक कांगणे (वय 52), पद उपअधिक्षक, भूमी अभिलेख कार्यालय, शेवगाव) यांनी वीस हजार रुपये लाचेची मागणी केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या कामासाठी त्यांनी खासगी इसम देवेंद्र त्रिंबक फुंदे (वय 40) खाजगी इसम, रा. शेवगाव) याच्या माध्यमातून 20 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. तक्रारदाराने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक यांच्या कडे लेखी तक्रार दाखल केल्यानंतर लाचलुचपत विभागाने विभागाने सापळा लावला. लाच पडताळणी दरम्यान लाचेची मागणी स्पष्ट झाल्यानंतर 19 जानेवारी रोजी ही कारवाई करण्यात आली.यावेळी खासगी इसम देवेंद्र फुंदे याने तक्रार दाराकडून 20 हजार रुपयांची लाच स्वीकारताच त्याला रंगेहाथ पकडण्यात आले आहे.या प्रकरणी शेवगाव पोलीस स्टेशनमध्ये भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 अंतर्गत कलम 7 आणि 12 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत ACB नाशिक येथील पोलीस निरीक्षक अमोल वालझाडे, पोलीस हवालदार संदीप हांडगे आणि पोलीस शिपाई सुरेश चव्हाण यांचे पथक सहभागी झाले होते.लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने सामान्य नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणत्याही शासकीय कामासाठी कोणी लाचेची मागणी केल्यास तत्काळ लाच लुचपत प्रतिबंधक विभागाशी (ACB) शी संपर्क साधावा. यासाठी टोल फ्री क्रमांक 1064 किंवा 9168641064 वर संपर्क साधता येईल. असे आवाहन करण्यात आले आहे.

शेवगांव तालुक्यातील अनेक शासकीय कार्यालयात भामटेगीरी करणारे अनेक भामटे लुडबुड करताना दिसत आहेत.शेवगाव शहरातील पुढील कार्यालयात महसूल खात्यातील तहसील कार्यालय, नगरपरिषद कार्यालय, सार्वजनिक बांधकाम विभाग PWD, महावितरण,शहर आणि ग्रामीण, पंचायत समिती, पाटबंधारे विभाग, वनखाते,तालुका कृषी अधिकारी कार्यलय,आणि इतर सरकारी आणि निम सरकारी कार्यालयात अनेक भ्रष्ट अधिकारी आणि कर्मचारी लोकांची लुबाडणूक करीत आहेत.त्यांच्याही मुसक्या आवळणे अत्यंत गरजेचे आहे.