राष्ट्रीय सेवा योजनेचे श्रमसंस्कार शिबिराचे उत्साहात उदघाटन
चोपडा: महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत हिवाळी श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन भाऊसो. शामराव शिवराम पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय चहार्डी, तालुका चोपडा जिल्हा जळगाव येथे दि. 18 जानेवारी 2026 ते 24 जानेवारी 2026 या दरम्यान करण्यात आले आहे. या शिबिराच्या उदघाटन समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.या शिबिरासाठी मा. भैयासाहेब ॲड. संदीप सुरेश पाटील अध्यक्ष, महात्मा गांधी शिक्षण मंडळ चोपडा, व ताईसो स्मिता संदीप पाटील सचिव, महात्मा गांधी शिक्षण मंडळ चोपडा यांनी शुभेच्छा दिल्या.
या शिबिराच्या उदघाटनप्रसंगी अध्यक्ष म्हणून विद्या प्रसारक मंडळ, चहार्डी चे अध्यक्ष डॉ. सुरेश शामराव पाटील, उद्घाटक म्हणून चहार्डी येथील माजी सैनिक प्रवीण बन्सीलाल पाटील, चहार्डी विद्या प्रसारक मंडळ चहार्डी चे उपाध्यक्ष डॉ.श्री. पराग पाटील, चहार्डी विद्या प्रसारक मंडळ चहार्डीचे सचिव प्रकाश पाटिल, महात्मा गांधी शिक्षण मंडळ कार्यकारी मंडळ सदस्य गोविंदा महाजन सदस्य, चहार्डी विद्याप्रसारक मंडळाचे संचालक जी. टी.पाटिल, चहार्डी विद्याप्रसारक मंडळाचे निलेश पाटील, चहार्डी चे उपसरपंच ज्ञानेश्वर पाटील , चहार्डी चे पोलीस पाटील जीवन महाजन, शा.शी उ.मा.वि. चहार्डी चे प्राचार्य पंकज पाटील, जीवन महाजन, शा.शी उ.मा.वि. चहार्डीचे माजी प्राचार्य विजय सोनवणे, महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ.के.एन. सोनवणे, महाविद्यालयाचे समन्वयक डॉ.एस.ए.वाघ आदि मान्यवर उपस्थित होते.
या शिबिराच्या उद्घाटनाप्रसंगी सुरुवातीला दीपप्रज्वलन करून राष्ट्रपिता महात्मा गांधी तसेच संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय दादासाहेब डॉ.सुरेश जी पाटील व माजी शिक्षण मंत्री स्वर्गीय आक्कासाहेब शरदचंद्रिका सुरेश पाटील यांच्या प्रतिमेस माल्यार्पण कऱण्यात आले. यावेळी राष्ट्रीय सेवा योजनेमधील जागृती बारी, कांचन शंभरकर,व प्रतीक्षा महाजन या स्वयंसेविकांनी स्वागतगीत सादर केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक श्री विशाल पी. हौसे यांनी केले. येणाऱ्या सात दिवसातील कार्यक्रमाच्या नियोजनाचा आराखडा त्यांनी आपल्या प्रास्ताविकेतून सादर केला. डॉ. के.एन. सोनवणे यांनी रासेयो स्वयंसेवकांना शुभेच्छा दिल्या तसेच हिवाळी श्रमसंस्कार शिबिर हे विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी असून या संधीचे सोने करून स्वयंसेवकांनी आपल्या व्यक्तिमत्त्वाचा विकास करावा. पर्यायी देशाचा विकास होईल असे मत त्यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे अध्यक्षीय मनोगत डॉ. सुरेश शामराव पाटील यांनी केले. शिबिराच्या माध्यमातून समाज विकास व स्वविकास साधावा असे त्यांनी स्वयंसेवकांना आवाहन केले. या उद्घाटन कार्यक्रमाला भाऊसो शामराव शिवराम पाटील, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय चहार्डी येथील प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक व कर्मचारी वृंद यांचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक कार्यक्रमाधिकारी सौ. एस. बी. पाटिल यांनी तर आभार डॉ. के. डी. गायकवाड यांनी केले.

















