चोपडा महाविद्यालयात आंतर विभागीय भारोत्तोलन, शक्तित्तोलन आणि शरीरसौष्ठव स्पर्धांचे यशस्वी आयोजन

चोपडा महाविद्यालयात आंतर विभागीय भारोत्तोलन, शक्तित्तोलन आणि शरीरसौष्ठव स्पर्धांचे यशस्वी आयोजन

चोपडा: येथे दि. २० व २१ नोव्हेंबर २०२३ रोजी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव आणि महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालय चोपडा यांच्या संयुक्त विद्यमाने येथे आंतरविभागीय भारोत्तोलन, शक्तित्तोलन आणि शरीरसौष्ठव स्पर्धांचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते. दि.२० नोव्हेंबर २०२३ रोजी शरीरसौष्ठव (पुरूष) स्पर्धेचे उदघाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष तसेच संस्थेचे अध्यक्ष ऍड. संदीप सुरेश पाटील तसेच कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव येथील क्रीडा संचालक डॉ. दिनेश पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
दि.२१ नोव्हेंबर २०२३ रोजी भारोत्तोलन, शक्तित्तोलन (पुरूष व महिला) या स्पर्धांचे उदघाटन संस्थेच्या सचिव तसेच या कार्यक्रमाच्या अध्यक्ष डॉ.सौ.स्मिताताई संदीप पाटील तसेच कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव येथील क्रीडा संचालक डॉ.दिनेश पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
या स्पर्धेला शारीरिक शिक्षण अभ्यास मंडळाचे चेअरमन व जळगाव विभाग क्रीडा समितीचे सचिव तसेच या स्पर्धेचे निवड समिती सदस्य व धनाजी नाना महाविद्यालयाचे क्रीडा संचालक प्रा.डॉ.गोविंद मारतळे, भालोद येथील निवड समिती सदस्य डॉ.मुकेश पवार, भडगाव येथील निवड समिती सदस्य डॉ. दिनेश तांदळे, तसेच एरंडोल विभाग क्रीडा समितीचे सचिव व पंकज महाविद्यालय, चोपडा येथील डॉ. विजय पाटील तसेच विविध विभागातील क्रीडा संचालक डॉ.भरत चालसे, डॉ. अरविंद कांबळे, प्रा.तेजस शर्मा, डॉ. शैलेश पाटील प्रा.राहुल पाटील, प्रा. उमेश पाटील, महाविद्यालयाचे उपप्राचार्य श्री.एन. एस. कोल्हे, उपप्राचार्य प्रा.डॉ. के. एन. सोनवणे तसेच जिमखाना विभाग समन्वयक प्रा. एम. जी. पाटील आदि मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ डी. ए. सुर्यवंशी यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी विद्यापीठाचे क्रीडा संचालक डॉ.दिनेश पाटील यांनी खेळाडूंना मार्गदर्शन करतांना सांगितले की, स्पर्धेत सहभागी होताना पदक प्राप्त करण्याच्या उद्देशाने व आपले ध्येय लक्षात ठेवून त्यानुसार स्पर्धेत सहभागी झाले पाहिजे. त्यासाठी महाविद्यालयाकडून मिळणाऱ्या सुविधांचा लाभ घेऊन नियमित सराव केला पाहिजे असे सांगून खेळाडूंना प्रोत्साहित केले.
महाविद्यालयाच्या क्रीडा संचालक डॉ. क्रांती क्षीरसागर यांनी स्पर्धेचे यशस्वी आयोजन केले. या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी अमोल पाटील, रवींद्र पाटील, सुधाकर बाविस्कर, विजय शुक्ल यांचे बहुमोल सहकार्य लाभले.
या स्पर्धेत धुळे, जळगाव, नंदुरबार व एरंडोल या चारही विभागातील खेळाडू सहभागी झाले होते. या स्पर्धांसाठी वेटलिफ्टिंग असोसिएशनचे जॉईंट सेक्रेटरी अविनाश महाजन, डॉ. मुकेश पवार, डॉ. दिनेश तांदळे, योगेश महाजन, कुणाल गोयर, कल्पेश महाले, किशोर महाजन यांनी पंच म्हणून यशस्वी कामगिरी बजावली.