जगद्गुरू श्रीमद् रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी दक्षिणपीठ नाणीजधाम यांच्या प्रेरणेने ग्रामीण रुग्णालय सोयगाव येथे आयोजित महारक्तदान शिबिरात 290 रक्तदात्यांनी केले रक्तदान
सोयगाव दि. 17 (तालुका प्रतिनिधी दत्तात्रय काटोले) –
जगद्गुरू श्रीमद् रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी दक्षिणपीठ नाणीजधाम यांच्या प्रेरणेने दि. 16 शुक्रवारी ग्रामीण रुग्णालय, सोयगाव येथे आयोजित महारक्तदान शिबिरात 290 रक्तदात्यांनी रक्तदान केले.
दरम्यान सकाळी आठ वाजता जगद्गुरू श्रीमद् रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन स्वामी विवेकानंद प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते ॲड. राजेश गिरी यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर रक्तसंकलनास सुरुवात करण्यात आली. यावेळी 290 रक्तदात्यांनी रक्तदान केले.
रेड प्लस रक्तपेढी, जळगाव येथील डॉ. अमोल शेलार, डॉ. रवींद्र पाटील, टेक्निशियन दीपक पाटील, वैष्णवी ठाकूर, मोहिनी जुमडे, अमोल सोये, शाहिद शेख, राजेश बारेला, बादल बारेला व नूरजहाँ तडवी यांनी रक्तसंकलनाचे काम केले.
श्रीगुरूदेव सेवा संप्रदाय समिती, सोयगाव तालुका यांनी महारक्तदान शिबिर यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले.

























