मनोज जरांगे पाटलांचा दिपक बोर्हाडे यांच्या नेतृत्वाखालील धनगर समाज एसटी आरक्षण आंदोलनाला जाहीर पाठिंबा, मराठा समाजाने धनगर आंदोलकांना पाणी,भाकरी, जेवण पुरवण्याचे जरांगे पाटलांचे आवाहन

(सुनिल नजन “चिफब्युरो” स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा)
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी सन २०१४ सालापासून वेळोवेळी धनगर समाजाला एसटी आरक्षण देण्याचे आश्वासन दिले होते.पण ते एसटी आरक्षण आजपर्यंत धनगर समाजाला दिले नाही.या आरक्षण मागणीसाठी धनगर समाजाचे नेते दिपक बोर्हाडे यांनी मुंबई येथे २१ जानेवारी रोजी होणाऱ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण महाराष्ट्रात धनगर समाजात जनजागृती केली होती.आणि दिनांक १७ जानेवारी पासून जालना जिल्ह्यातून ही आरक्षण यात्रा चौंडी,आरेवाडीचा बिरोबा,धुळोबा, जेजुरीचा खंडोबा या देवतांचे दर्शन घेऊन मुंबईला जाणार होती.परंतू सरकारने बीड, जालना जिल्ह्यात संचारबंदी लागू करून हे आंदोलन चिरडण्यासाठी पोलिस बळाचा वापर करून दिपक बोर्हाडे यांना अटक केली.त्यामुळे संपूर्ण राज्यभर खळबळ उडाली असून जालन्या सह अनेक जिल्ह्यातील धनगर समाजातील कार्यकर्ते आक्रमक होत रस्त्यावर उतरून आंदोलन करीत असल्याचे दिसून आले.दिपक बोर्हाडेच्या अटकेच्या निषेधार्थ रस्त्यावर टायर जाळून रस्ते बंद केले होते.हे आंदोलन चिरडण्यासाठी सरकार कडून प्रयत्न केल्याचे समाजाच्या लक्षात येताच संपुर्ण राज्यभर एकच भडका उडाला असून त्याचे संपूर्ण राज्यभर भयानक पडसाद दिसू लागताच दिपक बोर्हाडे यांना पोलिसांनी घाईघाईने लगेचच सायंकाळी सोडून दिले.ही माहिती मराठा आरक्षणाचे जनक मनोज जरांगे पाटलांना समजताच त्यांनी मराठा समाजाला आवाहन केले आहे की ज्या रस्त्यावरून धनगर समाजातील कार्यकर्ते मुंबई येथे जाणार आहेत त्या त्या रस्त्यावर मराठा समाजाने त्यांना पाणी,भाकरी, जेवण कमी पडू देऊ नका. मराठ्यांनी त्यांना मदत करावी असे आवाहन मिडियाशी बोलताना केले.जरांगे पाटील म्हणाले की सरकारने दिपक बोर्हाडे यांना अडवण्याचा काय संबंध,धनगर समाजाने मुंबईला जायलाच पाहिजे.मुंबई ही कोणाच्या बापाची जहागीरी नाही.धनगरांच्या लेकरांनी शिकायचे नाही का? पंधरा वर्षांपासून त्यांचे वाटोळे झाले आहे.या सरकारने मुस्लिम समाजाला आरक्षण दिले नाही,बंजारा समाजाला आरक्षण दिले नाही,संपूर्ण मराठ्यांना ही आरक्षण दिले नाही.आणि आता एसटी तून धनगर समाज आरक्षण मागायला लागला तर त्या मध्ये ही मध्येच अडवायचे राजकारण करायचे,त्यांना काय भ्यायचे नाही.धनगर समाजाला अडवण्याचा कोणाचाही काही संबंध नाही.धनगर समाजाने एसटी तून आरक्षण घ्यायच म्हणजे घ्यायचच.यामध्ये एका ही धनगराने राजकारण करू नये सर्वांनी ताकदीने उभ रहायच तरच लेकरा बाळाच कल्याण होईल.राजकारण नंतर करता येईल.पण आरक्षण जाऊ देऊ नका धनगरांच्या कित्येक पिढ्या सुधारतील राजकारण नंतर करा.तुम्ही कोणत्याही पक्षात असाल तर तीथेच रहा पण धनगर हे जर आरक्षणा साठी मुंबईला चालले असले तर सर्व धनगरांनी त्यांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे.मी मराठा समाजाला असे आवाहन करतो की ज्या ज्या रस्त्यावरून धनगर समाजाचे आंदोलन जाणार आहे त्या त्या रस्त्यावर त्यांना पाणी, भाकरी,जेवण हे मराठ्यांनी त्यांना पुरवावे काहीच कमी पडू देऊ नका.सगळ्या मराठ्यांनी तुटून पडा,त्यांना जेऊ खाऊ घाला, काहीच कमी पडले नाही पाहिजे.ज्या ज्या रस्त्यावरून धनगर समाज एसटी आरक्षण लढा जाणार त्या रस्त्यावर मराठ्यांनी काम करावे असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केले आहे.जरांगे पाटलांनी जाहीर पाठिंबा दिल्यामुळे धनगर समाज एसटी आरक्षण लढ्याला आता चांगलेच बळ मिळाले आहे.हा निर्णायक लढा आता वेगळ्या वळणावर येऊन ठेपला आहे.सरकारने कितीही कारणं सांगून तोंड दडवले तरी आता कोणत्याही परिस्थितीत धनगर समाजाला एसटी आरक्षण द्यावेच लागेल अशी व्युहरचना करण्यात येत आहे.या आरक्षण लढ्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचे ही दरवाजे ठोठावण्या साठी वकिलांची एक टीम चांगलीच कामाला लागली आहे.

























