आव्हाणे येथील गजानन माध्यमिक विद्यालयात शेषराव आव्हाड सर व सौ कमल आव्हाड यांचा सेवापुर्ती सोहळ्या निमित्त सपत्नीक सन्मान सोहळा संपन्न

आव्हाणे येथील गजानन माध्यमिक विद्यालयात शेषराव आव्हाड सर व सौ कमल आव्हाड यांचा सेवापुर्ती सोहळ्या निमित्त सपत्नीक सन्मान सोहळा संपन्न

 

 

 

(सुनिल नजन चिफब्युरो स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर)

नगर जिल्ह्यातील

शेवगाव तालुक्यातील वडुले खुर्द येथील माध्यमिक शिक्षक शेषराव शामराव आव्हाड व त्यांच्या सौभाग्यवती कमलताई आव्हाड यांचा सेवापुर्ती सोहळ्या निमित्त माजी आमदार नरेंद्र पाटील घुले यांच्या हस्ते सपत्नीक सन्मान करण्यात आला.शेषराव आव्हाड सर हे गेल्या ३४ वर्षाच्या प्रदिर्घ सेवेनंतर शेवगाव तालुक्यातील आव्हाणे येथील गजानन माध्यमिक विद्यालयातून सेवा निवृत्त झाले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार नरेंद्र पाटील घुले हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून तारकेश्वर गडांचे महंत आदिनाथ महाराज शास्त्री हे होते.सत्काराला उत्तर देताना शेषराव आव्हाड सर म्हणाले की ज्या आई वडिलांच्या पोटी मी जन्म घेतला त्यांनी मला ज्या चांगल्या गोष्टींची शिकवणी दिली त्याच आई बापाची शिकवण माझ्या आयुष्यात मला मोलाची ठरली.त्यांच्या शिकवणी नुसार मी जीवनाचा रस्ता चालत राहिलो त्यामुळे माझ्या जीवनाचे सोने झाले. स्वर्गीय मारूतराव घुले पाटील यांच्या शिक्षण संस्थेत नोकरी करीत असताना मी प्रामाणिकपणे नोकरी केली.त्यामुळे माझे कल्याण झाले. आपण जीवन जगत असताना जीवनात जर प्रामाणिक पणा धरला तर देव तुमचे कल्याण केल्या शिवाय राहणार नाही. तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ महाराज शास्त्री यांचे मला आशिर्वाद लाभले म्हणून मी या स्थानापर्यंत पोहोचलो.यावेळी अध्यक्ष पदावरून बोलताना नरेंद्र पाटील घुले असे म्हणाले की शेवगाव तालुक्यात बहुजन समाजाची मुले शिक्षण घेत आहेत.या गोष्टीचा मला जास्त अभिमान आहे.स्वर्गिय मारुतरावजी घुले पाटील यांच्या आशीर्वादानेच ही शिक्षणाची दालने खुली झाली आहेत.सेवानिवृत्त शिक्षक शेषराव आव्हाड सर यांना उर्वरित आयुष्य चांगले व सुख समृद्धीचे जावो अशी शुभकामना मी व्यक्त करतो.या प्रसंगी कुमारी अंधेरी आव्हाड, कुमारी आरेकर सीद्धी,पुजा चितळे मॅडम, आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे जिल्हा कार्याध्यक्ष संजूभाउ कोळगे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.गजानन माध्यमिक विद्यालयास व तारकेश्वर गडास प्रत्येकी एक लाख रुपयांची देणगी शेषराव आव्हाड सर यांनी जाहीर केली.या कार्यक्रमास संस्थेचे प्रशासकीय अधिकारी के वाय नजन सर,समन्वयक विजयराव काशिद, नगरसेवक सुनिल काकडे सर, सुनिल आव्हाड सर,कल्याणराव म्हस्के सर,गणेश कराड, चंद्रकांत रणमले,राजेंद्र रणमले,राजेंद्र शिरसाठ,भरतराव वांढेकर,विश्वास वांढेकर,जनार्दन आव्हाड,राजेंद्र आव्हाड,सचिन आव्हाड,महादेव आव्हाड,विकास आव्हाड,दिलिप किसन आव्हाड, युवा नेते भाऊसाहेब आव्हाड,अमोल आव्हाड,पोलिस पाटील बाळासाहेब आव्हाड,तात्या भाउ तुतारे,रोहन साबळे बबनराव भुसारी,अंबादास कळमकर,अनिल कोळगे,शिवाजी भुसारी,रामदास वाघमारे,कचरू चोथे,सुधाकर लांडे,अंकुश आहेर,पांडुरंग नागरे,गणेश नरुटे, नवनाथ महाराज आव्हाड, काकासाहेब घुले सुभाष वाणी,भरत मिसाळ,सुनिल शिंदे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.प्रिती भोजना नंतर या सोहळ्याची सांगता झाली.शेवगाव तालुक्यातील अनेक गावांतील आव्हाड सर यांचे चाहते यांनीही त्यांचा सपत्नीक सत्कार केला.