भाजपने जर तिसगाव जिल्हा परिषद गटात तिकीट दिले तर संधीचे सोने करणार,नाही दिले तर बंडखोरी करणार नाही,पक्षसंघटना मजबूत करणार, कुशल भापसे यांचे पत्रकार सन्मान सोहळ्यातील प्रतिपादन

भाजपने जर तिसगाव जिल्हा परिषद गटात तिकीट दिले तर संधीचे सोने करणार,नाही दिले तर बंडखोरी करणार नाही,पक्षसंघटना मजबूत करणार, कुशल भापसे यांचे पत्रकार सन्मान सोहळ्यातील प्रतिपादन

 

 

 

(सुनिल नजन “चिफब्युरो” स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा) ‌ ‌ ‌ भाजपने तिसगाव जिल्हा परिषद गटात जर जिल्हा परिषद निवडणूकीचे तिकीट दिले तर निश्चितच संधीचे सोने करणार,नाही दिले तर पक्ष संघटना मजबूत करणार असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष कुशलजी प्रमोद भापसे यांनी केले. ते वृत्तपत्र सृष्टीचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त पत्रकार दिनाचे औचित्य साधून अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील निवडुंगे येथिल हाॅटेल चैतन्य येथे झालेल्या पाथर्डी तालुक्यातील सर्व पत्रकारांच्या सन्मान सोहळ्यात बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार अविनाश मंत्री गुरूजी हे होते.कुशलजी भापसे पुढे म्हणाले की नामदार विखे पिता पुत्र,जिल्हा बँकेचे संचालक अक्षय कर्डिले, आमदार मोनिकाताई राजळे,आमदार प्रसादजी लाड साहेब,निताताई लाड,यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे धुळे,जळगाव, नाशिक,या जिल्ह्यात प्रभारी म्हणून पक्ष संघटना मजबूत करण्या साठीचे जोरात काम सुरू आहे.तरीही माझे तिसगाव जिल्हा परिषद गटातील अनेक गावात सामाजिक उपक्रम सुरू आहेत. पावसामुळे अतीवृष्टीत सापडलेल्या कुटुंबातील १२५ मुलांना शिक्षणासाठी दत्तक घेतले आहे.त्यांच्या शिक्षणाचा खर्च उचलून पूरग्रस्तांना हातभार लावला आहे.३५० कुटुंबांना किराणा मालाचे किट वाटप केले आहे.तसेच क्रिकेट,फुटबॉल, हाॅलीबाॅल,या खेळाचे साहित्य अनेक गावांत उपलब्ध करून दिले आहे.तसेच महिला बचत गटांचे शिबिर आयोजित करून महिला सक्षमी करणासाठी प्रयत्न केले आहेत.मुंबई येथील अंत्योदय प्रतिष्ठानच्या अध्यक्षा निताताई लाड यांच्या माध्यमातून गाव समृद्ध योजना, पाणी आडवा आणि जिरवा, शासकीय योजनेचे अनुदान मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असुन महीलांची एक कंपनी तयार करून त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्यात येणार आहे.जिल्हा परीषद शाळा खोल्या डीजिटल करुन दर्जेदार शिक्षणासाठी प्रयत्न करणार आहे.शेतकऱ्याना कोणत्याही प्रकारची फी न घेता शासकीय योजनेचे अनुदान मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार.शेवटच्या घटका पर्यंत जाऊन त्यांचे विज,पाणी आणि रस्ते या संदर्भातील प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.तसेच येणाऱ्या काळात भाजपने मला योग्य ठरवून उमेदवारी दिली तरच जिल्हा परिषदेची उमेदवारी करणार आणि नाही दिली तर भाजपच्या नियमांचे काटेकोर पालन करणार.आणि पक्ष संघटना मजबूत करणार असल्याचे त्यांनी सांगितले.पाथर्डी तालुक्यातील तिस पत्रकारांना पुष्प, पेन,डायरी,शाल,फेटा बांधून सन्मानित केले.आणि प्रिती भोजन देऊन पत्रकार दिन साजरा केला. तिसगाव आणि मीरी जिल्हा परिषद गटात झालेल्या पत्रकार दिनाची संपूर्ण जिल्हा भर चर्चा सुरू आहे.या गटात सत्तेवर असताना कोणत्याही पक्षाच्या एका ही जिल्हा परिषद सदस्यांनी

पत्रकार दिनानिमित्त पत्रकारांना कधीच सन्मानित केले नाही.परंतू जिल्हा परिषद सदस्य नसताना देखील मीरीतील डॉ नंदकुमार नरसाळे पाटील, विजयकुमार कोरडे साहेब, आणि तिसगाव गटातील कुशल भापसे पाटील यांनी पत्रकारांच्या लेखणीची कदर करून पत्रकार दिन साजरा केला त्या बद्दल पाथर्डी तालुक्यातील सर्व पत्रकार त्यांचे ऋणी आहेत.फक्त कामापुरते वापरून घेणारे आणि फुकटच्या प्रसिद्धीला हपापलेले अनेक टोळभैरे हे परीसरातील पत्रकारांनी आता चांगलेच लक्षात ठेवले पाहिजे.हे कार्यक्रम पाहून आता अनेक जण शिळ्या कढीला उत आणतील आणि वरातीमागून घोडे काढून पुढे दामटतील ही परंतु पत्रकार दिनाला जे महत्त्व आहे ते इतर वेळी नाही हे इतरांनी लक्षात ठेवलं पाहिजे.