परराज्यातून गांजाची चोरटी वाहतूक करणारी टोळी मीरी रस्त्यावर रंगेहाथ पकडली, फळांच्या कॅरेट खाली चक्क साठ किलो गांजासह एकूण २७,४१, २०० रुपये किंमतीचा मुद्देमाल पोलिसा कडून जप्त
(सुनिल नजन “चिफब्युरो” स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा) परराज्यातून गांजाची चोरटी वाहतूक करणारी टोळी जेरबंद करण्यात पाथर्डी पोलिसांना यश आले आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील मीरी ते पांढरी पूल या रस्त्यावर एका पिक अप गाडी मध्ये फळांच्या कॅरेट खाली चक्क साठ किलो गांजाची पोती आढळून आली होती.मंगळवार दिनांक ६ जानेवारी २०२६ रोजी सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास गाडी नंबर mp 46 ze 0539 ही गाडी फळांचे कॅरेट घेऊन अहिल्या नगरच्या दिशेने जात होती.त्या गाडीला पोलीसांनी थांबवले असता त्या गाडीमध्ये फळांनी भरलेले कॅरेट होते.त्या कॅरेट खाली चक्क साठ किलो गांजा पोत्यात बांधून ठेवलेला होता. तुलशिदास दुर्गादास खरगे (वय25वर्षे), आणि त्याचा साथीदार दिनेश सिलदार सोळंकी (वय24) दोघें राहणार ,गोई, तालुका,सेंदवा, जिल्हा, बिडवाणी, मध्यप्रदेश यांना रंगेहाथ पकडल्यामुळे परराज्यात गांजाची चोरटी विक्री करणारी टोळी जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे. साठ किलो गांजाची किंमत २० लाख,४१हजार, २०० रुपये आहे तर वाहतूक करणाऱ्या वाहनांची किंमत ७ लाख रुपये आहे.असा एकूण २७ लाख ४१ हजार २०० रुपये किंमतीचा मुद्देमाल पोलीसांनी जप्त केला आहे.या बाबद पाथर्डी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर नंबर २२/२०२६ ndps ॲक्ट १९८५चे कलम ८(सी), २०(बी),२(सी),२९प्रमाणे ६ जानेवारी रोजी रात्री सव्वा अकरा वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आणि दोन संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे.सदरची कारवाई ही अहिल्यानगर जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे साहेब अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्मे साहेब आणि पाथर्डी पोलिस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक विलास पुजारी साहेब, पोलिस उपनिरीक्षक संदिप ढाकणे, विलास जाधव, निवृत्ती आगरकर, संभाजी कुसळकर,सागर बुधवंत, ज्ञानेश्वर ईलग,संजय जाधव,ईजाज शेख,भगवान टकले, कानिफनाथ गोफणे,अक्षय लबडे,बाबासाहेब बडे,यांच्या मार्गदर्शना खालील पोलिस पथकाने केली आहे. परराज्यात जाऊन गांजाची चोरटी वाहतूक करणारी टोळी पकडल्यामुळे पोलिस खात्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.गांजाची वाहतूक करणाऱ्या अजूनही अनेक टोळ्या जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील अनेक गावांत कार्यरत आहेत त्यांचा ही पोलिसांनी बंदोबस्त करावा अशी मागणी जनतेतून केली जात आहे.























