राज्य खो खो स्पर्धेसाठी जळगांव जिल्ह्याच्या किशोर/किशोरी खो खो संघाच्या कर्णधारपदी सुमित पाटील व सोनाली घेंगट यांची निवड
जळगाव (क्रीडा प्रतिनिधी)–महाराष्ट्र खो खो असोसिएशनने सन 2025-26ची किशोर/किशोरी या विभागाची 39 वी राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो खो स्पर्धा दिनांक 25 डिसेंबर ते 28 डिसेंबर 2025 या कालावधीत वडाळा, मुंबई येथे आयोजित केली आहे. यात जळगांव जिल्ह्याचा संघ सहभागी होत असून या संघाची निवड समिती सदस्य म्हणून दत्तात्रय महाजन, विशाल पाटील, दिलीप चौधरी, तुषार सोनवणे यांनी काम पाहिले. या संघाला संघटनेचे पदाधिकारी आ.प्रा.चंद्रकांत सोनवणे, प्रा.डी. डी. बच्छाव, उदय पाटील, एन. डी. सोनवणे, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्राप्त गणपतराव पोळ, प्रा.श्रीकृष्ण बेलोरकर, सुनिल समदाने, महाराष्ट्र खो खो असोसिएशनचे सहसचिव जयांशू पोळ, सौ.विद्या कलंत्री, जळगांव जिल्हा खो खो असोसिएशनचे सचिव राहुल पोळ यांनी स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
किशोर/किशोरी संघ पुढील प्रमाणे.
किशोर :- सुमित पाटील (कर्णधार), तृशांत बोरकर, प्रितम पावरा, सुन्या पाडवी, राजेश बारेला, वरद महाजन, कमलेश बारेला, ओम पारधी, आर्यन पाटील, उत्कर्ष काबरा, कार्तिक सांळूखे, रुद्र मराठे, श्रेयस पाटील, रुद्र बाविस्कर, ज्ञानेश्वर पवार
प्रशिक्षक :- विशाल पाटील तर व्यवस्थापक दिलीप चौधरी
किशोरी :- सोनाली घेंगट (कर्णधार), लक्ष्मी पावरा, पूर्वी सोनवणे, जिविका पाटील, नेहा धांडे, उषा राऊत, कोमल नेहेते, धनश्री पाटील, दिया पाटील, दिशा ताडे, प्रतीक्षा पांगळे, अमृता नाझरकर, तेजल कोळी, प्रेरणा भालेराव, रोहिणी पाटील
प्रशिक्षक :- दत्तात्रय महाजन तर व्यवस्थापक वर्षा महाजन

















