होमगार्ड वर्धापन दिनानिमित्त सोयगाव येथे स्नेहभोजन व सत्कार सोहळा

होमगार्ड वर्धापन दिनानिमित्त सोयगाव येथे स्नेहभोजन व सत्कार सोहळा

 

 

 

 

सोयगाव :दत्तात्रय काटोले

सोयगाव शहरातील होमगार्ड वर्धापन दिनानिमित्त प्रसिद्ध श्री भैरवनाथ संस्थान, सोयगाव येथे होमगार्ड बांधवांसाठी स्नेहभोजन व सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पारंपरिक दाळ-बट्टीच्या जेवणाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.

 

या कार्यक्रमात समाजातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये श्री भैरवनाथ संस्थानचे अध्यक्ष दिलीप बिर्ला, नगरसेवक राजेंद्र जावळे, अशोक खेडकर, समाजसेवक संजय शहापूर, शालिक अप्पा (काळे नगर), सुनील गावंडे, मयूर मनगटे, प्रमोद रावणे, भगवान पंडित, संदीप सोमाणी, मच्छिंद्र महाले, राजू पाटील, विजय जावळे, दत्ता देशाई, प्रल्हाद चौधरी तसेच पत्रकार विजय पगारे, विजय काळे, पूनम परदेशी, ईश्वर इंगळे,भारत पगारे, दत्तात्रय काटोले, दिलीप शिंदे यांचा समावेश होता.

 

कार्यक्रमास सर्व स्तरातील नागरिक, मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते व होमगार्ड जवान मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी होमगार्ड जवानांच्या सेवाभावी कार्याचे कौतुक करत समाजासाठी त्यांच्या योगदानाचा गौरव केला.

 

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी तालुका समादेशक अधिकारी कडूबा बावस्कर, लिपिक कृष्णा शेवाळकर तसेच सोयगाव येथील कर्तव्यदक्ष होमगार्ड जवान गजानन बागुल, समाधान काळे, विजय चौधरी, ज्ञानेश्वर काळे, ऋषी काळे, दत्तात्रय काटोले, राज मोहम्मद पिंजारी, गजानन गोतमारे, चंद्रशेखर देशमुख, रमेश चक्की, रवींद्र सरोदे, विशाल घन, किरण सपकाळ, भाग्यवान बनसोडे, विनोद इंगळे, विष्णू गव्हाणे, संतोष परेराव, संतोष घुंगरे, ईश्वर सोनवणे, अरुण वाघ, साहेबराव हटकर, रघु परदेशी, शकील शेख, श्रीराम जोहरे, विजय रावणे, विजय गरुड आदींनी विशेष परिश्रम घेतले.

 

दरवर्षी गणेशोत्सव, नवरात्रोत्सव तसेच वर्धापन दिनानिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबवून सोयगाव गुरु रक्षक दलाच्या जवानांनी शहरात वेगळी ओळख निर्माण केली आहे, असे मत कृषी भूषण अरुण सोहणी यांनी व्यक्त केले.

 

फोटो. दत्तात्रय काटोले