नवचैतन्य व्यसनमुक्ती केंद्रास स्व.राजेंद्रजी श्रीवास्तव M.S.W महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची भेट

नवचैतन्य व्यसनमुक्ती केंद्रास स्व.राजेंद्रजी श्रीवास्तव M.S.W महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची भेट

 

 

पारध ( श्री महेंद्र बेराड भोकरदन तालुका प्रतिनिधी ) – भोकरदन तालुक्यातील पारध शाहूराजे येथील स्व.राजेंद्रजी श्रीवास्तव समाजकार्य ( M.S.W ) महाविद्यालयाच्या M.S.W भाग-I च्या विद्यार्थी दि.19/12/2025

शुक्रवार रोजी प्राचार्य आर.ए.कदम यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रा.एस.एम.लक्कस

यांच्या नेतृत्वामध्ये कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाच्या अभ्यासक्रमानुसार क्षेत्रकार्य अध्ययन उपक्रमातंर्गत शेलूद येथील नवचैतन्य व्यसनमुक्ती केंद्रास भेट दिली .

दरम्यान प्रा. आर.ए.कदम यांनी प्रास्ताविक केले.या प्रसंगी नवचैतन्य व्यसनमुक्ती केंद्राचे संचालक ज्ञानेश्वर माऊली महाराज शेलुदकर यांनी नवचैतन्य व्यसनमुक्ती केंद्रातर्फे राबविण्यात येणारे विविध उपक्रम , केंद्राचे ध्येय धोरण तसेच दिल्या जाणाऱ्या सोयीसुविधा याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले तसेच त्यांनी एकाच छताखाली तात्पुरता निवारा , वैद्यकीय सेवा , कायदेशीर समुपदेशन , तात्काळ सेवा, दुरचित्रवाणी संमलेन इत्यादी विषयी माहिती देवून विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची समर्पक उत्तरे दिली आणि व्यसनमुक्तीविषयी मार्गदर्शन करून आपले मनोगत व्यक्त केले . तसेच दुसरी भेट विद्यार्थ्यांनी सखीवन स्टॉप सेंटर बुलढाणा येथे दिली . यामध्ये ॲड अंजना घोंगडे यांनी संकटग्रस्त महिलांना मोफत 24 तास सेवा , तात्काळ मदत , कौटुंबिक हिंसाचास पासून महिलांचे सरंक्षण कायदा ,बलात्कार , फसवणूक व परिस्थिती अनुरूप अत्याचाराला बळी पडलेल्या संकटग्रस्त महिलांना मदत व उपचार कसे मिळवून दिले जाते . याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच छत्रपतीसंभाजीनगर येथील सखी वनस्टॉप सेंटरच्या आश्विनी घुगे यांनी विद्यार्थ्यांना पोक्सो कायदा , पोश कायदा ,गुड टच,बॅड टच तसेच संकटग्रस्त महिला व मुलींसोबत येनारे अनुभव कथन केले. आभार प्रदर्शन आश्विनी अंभोरे या विद्यार्थिनीने केले . या प्रसंगी स्व.हरिवंशराय बच्चन बहुद्देशीय सेवाभावी संस्थेमार्फत संचालित स्व.राजेंद्रजी श्रीवास्तव समाजकार्य महाविद्यालयात पारध येथे M.S.W या अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊन व अभ्यासक्रम पूर्ण करून विद्यार्थ्यांनी शासकीय पद्धतीने समुपदेशन करण्याचे आव्हान संस्थेचे सचिव श्री.विक्रांत राजेंद्र श्रीवास्तव यांनी केले . संस्थेचे संस्थापक यावेळी प्रमुख उपस्थिती नवचैतन्य व्यसनमुक्ती केंद्राचे संचालक अध्यक्ष मा.श्री.ज्ञानेश्वर माउली महाराज शेलुदकर,संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा.श्री.मनीष भैय्या श्रीवास्तव तसेच सर्व पत्रकार बांधव आणि M.S.W भाग-I चे विद्यार्थी उपस्थित होते . कार्यक्रम पूर्णत्वास जाण्यासाठी नवचैतन्य व्यसनमुक्ती केंद्राचे कर्मचारी,महाविद्यालयाचे कर्मचारी व विद्यार्थ्यांनी यांनी परिश्रम घेतले .