लग्नातील प्रिवेड्डींग ही संस्कृती नाही तर ती विक्रृती आहे,हींदू संस्कृतीचा घात करुन घाला घालण्या साठीचा तो नास्तिकांचा डाव : ह.भ.प. आदिनाथ महाराज शास्त्री

लग्नातील प्रिवेड्डींग ही संस्कृती नाही तर ती विक्रृती आहे,हींदू संस्कृतीचा घात करुन घाला घालण्या साठीचा तो नास्तिकांचा डाव : ह.भ.प. आदिनाथ महाराज शास्त्री

 

 

(सुनिल नजन “चिफब्युरो” स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा) लग्नातील प्रिवेड्डींग ही संस्कृती नाही तर ती विक्रृती आहे ते चांगले नाही.हींदू संस्कृतीचा घात करुन संस्कृती वर घाला घालण्याचा तो छुपा डाव आहे असे प्रतिपादन तारकेश्वर गडाचे महंत ह.भ.प. आदिनाथ महाराज शास्त्री यांनी केले.ते अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील कोपरे येथे संत भगवानबाबा आणि संत वामनभाउ मंदिर मुर्ती प्राणप्रतिष्ठा वर्धापन दिनानिमित्त त्रिदिवसीय किर्तन महोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी काल्याच्या किर्तना प्रसंगी ते बोलत होते.ह.भ.प. आदिनाथ महाराज शास्त्री पुढे म्हणाले की प्रिवेड्डींग पाहू नका आणि पाहायचेय असेल तर “छावा” चित्रपट पाहिला पाहिजे की जेणेकरुन आपल्याला काही तरी प्रेरणा मिळेल मार्गदर्शन मिळेल तो चित्रपट पाहुण आपल्या मध्ये काहीतरी जीद्द निर्माण होईल आणि ऐकायचेच असेल तर भजन कीर्तन,प्रवचन, हरीपाठ ऐका.दुष्मनाचे चरीत्र तर कधीच ऐकू नये.नारद भक्तीसुत्रात असे सांगितले आहे की “नास्तिक धन वैरी चरीत्रम् या श्रवणीयम्” नास्तिकाचे चरीत्र ऐकू नये.नास्तिक जरी बोलण्यात शब्द पंडित असला तरी त्याच्या मुखातून ऐकू नये कारण त्यांच्या मुलाला भक्तीचा ओलावा नसतो.तो ज्ञान शुष्क असतो.जर ते आपण ऐकले तर आपले श्रद्धा स्थान विचलित होण्याची संभावना असते.महाराजांनीअसा नास्तिक लोकांवर शाब्दिक प्रहार करीत आपला ज्ञानरूपी आसुड ओढत सज्जन माणसांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालून उपस्थित श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.त्यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या धार्मिक कार्याला पदस्पर्श करीत अहिल्यादेवींनी त्या काळात बांधलेल्या पाणवठ्या साठीच्या अनेक बारवा आणि बारा जोतिर्लींगाची उभारण्यात आलेली मंदिरे या गोष्टीना उजाळा दिला.भाउ बाबांच्या परमभक्त श्रीमती सिताबाई धोंडीबा आव्हाड यांनी या मंदिराचा ग्रामस्थांच्या सहकार्याने जिर्णोद्धार केला.त्याचा हा वर्धापन दिन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.पंढरपूर येथील मठाच्या बांधकामासाठी आदिनाथ महाराज शास्त्री यांना कोपरे ग्रामस्थांच्या वतीने लाखो रुपयांची देणगी जाहीर करण्यात आली. या सोहळ्याच्या निमित्ताने ह.भ.प.महेश महाराज आव्हाड आणि सुदर्शन महाराज शास्त्री यांचे पहिले दोन दिवस किर्तने झाली.एकनाथ अहिलाजी आव्हाड,संजय धोंडीबा आव्हाड, विजय धोंडीबा आव्हाड यांनी दोन दिवस अन्नदान केले.जळगाव येथील भाउबाबांचे भक्त देविदास सांगळे यांच्या काल्याच्या महाप्रसादाच्या पंगतीने या सोहळ्याची सांगता झाली.प्रारंभी सौ. मंदाबाई आंधळे आणि अर्जुन आंधळे यांनी महाराजांचे औक्षण केले.नंतर सौ.कांताबाई संजय आव्हाड आणि सौ. वैशाली विजय आव्हाड यांच्या कुटुंबीयांनी औक्षण केले.या प्रसंगी गहिनीनाथ महाराज खेडकर, विष्णु महाराज सानप,तात्या महाराज गुणारे, म्रुदुंगाचार्य नारायण महाराज केदार,पेटी मास्तर वसंतराव आव्हाड,सुधाकर बोरूडे,म्हातारदेव उघडे,माजी सरपंच रमेश आव्हाड,युवा नेते भाऊसाहेब उघडे, आदिनाथ शिरसाठ,अशोक आव्हाड,छबुराव आंधळे,नितिन आव्हाड,नारायण वाघमोडे, आदिनाथ खेडकर,नामदेव आव्हाड,सोमनाथ आव्हाड,भगवान आव्हाड,मारुती क्षिरसागर, शिवाजी उघडे,कोंडीराम आंधळे,सुनिल आव्हाड आणि टाकळी कोपरे पंचक्रोशीतील संत भगवान बाबा आणि संत वामनभाउ यांना मानणारे अनेक भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. मंदिर स्थापने पासून दरवर्षीच हा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.