भडगाव तालुक्यातील अर्णव,गौतम व मयुर या ॲथेलिट्सची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड….!!!!!
भडगाव (वार्ताहर)– भडगाव तालुक्यातील गो.पु.पाटील, विद्यालय,कोळगाव येथील अर्णव खैरणार (४०० मी धावणे,प्रथम), गौतम पाटील (८०० मी धावणे, द्वितीय,१५०० मी धावणे तृतीय), जयदीप सोनवणे (१०० मी धावणे तृतीय) तसेच ज.ग. पुर्णपात्री कनिष्ठ महाविद्यालय,भडगाव येथील मयुर पवार (गोळाफेक,द्वितीय) यांनी आज स्व.मीनाताई ठाकरे,विभागीय क्रीडा संकुल,हिरावाडी,पंचवटी,नाशिक येथे आयोजित नाशिक विभागीय शालेय मैदानी स्पर्धेत यश मिळवले आहे.
अर्णव,गौतम व मयुर या तिघांची डेरवण ता–चिपळूण जि.रत्नागिरी येथे ११ ते १४ नोव्हेंबर दरम्यान आयोजित राज्यस्तरीय शालेय मैदानी स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
सदरील खेळाडूंना भडगाव तालुका क्रीडा समन्वयक प्रा.डॉ.सचिन भोसले, आदर्श क्रीडा शिक्षक प्रा.सतीश पाटील,आदर्श क्रीडा शिक्षक बी.डी.साळुंखे तसेच राष्ट्रीय खो–खो पंच प्रा.प्रेमचंद चौधरी यांचे मार्गदर्शन लाभले.
राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या सर्व खेळाडूंचे भडगाव तालुका क्रीडा समितीच्या सर्व सदस्यांनी तसेच क्रीडा शिक्षकांनी अभिनंदन करुन पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

























