कोपरे येथे संत भगवानबाबा आणि संत वामनभाउ मंदिर मुर्ती प्राणप्रतिष्ठा वर्धापन दिनानिमित्त त्रिदिवसीय किर्तन सोहळ्याचे आयोजन

कोपरे येथे संत भगवानबाबा आणि संत वामनभाउ मंदिर मुर्ती प्राणप्रतिष्ठा वर्धापन दिनानिमित्त त्रिदिवसीय किर्तन सोहळ्याचे आयोजन

 

 

(सुनिल नजन “चिफब्युरो” स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा) संपूर्ण महाराष्ट्रातील विविध समाजाचे आराध्य दैवत असलेल्या सर्व श्रेष्ठ संत भगवानबाबा आणि संत वामनभाउ यांचे अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील कोपरे येथे हे मंदिर उभारण्यात आले आहे. भाउबाबाच्या परमभक्त श्रीमती सिताबाई धोंडीबा आव्हाड यांच्या इच्छेनुसार व मनातील संकल्पनेतून हे मंदिर उभारण्यात आले आहे.या मंदिरातील मूर्ती प्राणप्रतिष्ठेच्या वर्धापन दिनानिमित्त आव्हाड आणि आंधळे परीवाराच्या वतीने तिन दिवसीय किर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा सोहळा दिनांक ९ ते ११ नोव्हेंबर या काळात साजरा करण्यात येणार आहे. ह.भ.प.महेश महाराज आव्हाड,ह.भ.प. सुदर्शन महाराज शास्त्री,यांचे दोन दिवस रात्री ७ ते ९ या वेळेत किर्तने होणार आहेत. दिनांक ११/११/२०२५ या दिवशी सकाळी ९ ते११या वेळेत तारकेश्वर गडाचे महंत ह.भ.प. आदिनाथ महाराज शास्त्री यांच्या काल्याच्या किर्तनाने आणि ढोरजळगाव येथील देविदास सांगळे यांच्या महाप्रसादाच्या पंगतीने या वर्धापन दिन सोहळ्याची सांगता होणार आहे.या सोहळ्या साठी गहिनीनाथ महाराज खेडकर, विष्णु महाराज सानप,तात्या महाराज गुणारे, नारायण महाराज केदार हे साथ संगत करणार आहेत.तरी हनुमान टाकळी,कोपरे, वडुले,वाघोली, जवखेडे खालसा पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी आणि भजनी मंडळांनी या किर्तन सोहळ्याचा लाभ घ्यावा असे आवाहन आव्हाड आंधळे परीवार आणि कोपरे ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.या काळात दररोज पहाटे ४ वाजता काकडा भजन, सायंकाळी ६ वाजता हरीपाठ,आणि रात्री सात ते नउ या वेळेत किर्तनाचे आयोजन या प्रमाणे रुपरेषा ठरवण्यात आली आहे.