पारध शाहूराजे येथे ओबीसी समाजाची चिंतन व आढावा बैठक संपन्न — संघटित शक्तीने निवडणुकीत उतरायचा निर्धार

पारध शाहूराजे येथे ओबीसी समाजाची चिंतन व आढावा बैठक संपन्न — संघटित शक्तीने निवडणुकीत उतरायचा निर्धार

 

 

पारध शाहूराजे (प्रतिनिधी) :
रविवार, दिनांक 19 ऑक्टोबर 2025 रोजी पारध शाहूराजे ता. भोकरदन येथे ओबीसी समाजाची चिंतन व आढावा बैठक उत्साहात पार पडली. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर समाजाची भूमिका ठरवण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती.

या बैठकीचे अध्यक्षस्थान ज्येष्ठ नेते दिलीप बेराड यांनी भूषवले. प्रमुख मार्गदर्शक म्हणून ओबीसी नेते ॲड. एफ. एच. सिरसाठ आणि बहुजनवादी विचारवंत मु. एम. बी. मगरे (छत्रपती संभाजीनगर) उपस्थित होते. ॲड. सिरसाठ यांनी “ओबीसी समाजाची दशा व दिशा आणि उपाय योजना” या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. तर एम. बी. मगरे यांनी आपल्या भाषणात सांगितले की सर्व राजकीय पक्षांनी आतापर्यंत ओबीसी समाजाचा केवळ वापरच केला आहे, त्यामुळे आता ओबीसी समाजाने जागृत होऊन स्वतःचा सक्षम राजकीय पर्याय उभा करणे व संघटित शक्तीचे प्रदर्शन करणे अत्यावश्यक आहे.

बैठकीत पारध येथील विविध समाज घटकांतील प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यामध्ये किरणशेठ श्रीवास्तव, डॉ. उमेशचंद्र वडगावकर,ज्ञानेश्वर मोरे, रामधन साबळे,जनार्दन पाखरे,संदीप क्षीरसागर,नरेंद्र कानडे, महेंद्र बेराड, संदीप काटोले, ज्ञानेश्वर आल्हाट,अमोल पाखरे,गणेश तेलंग्रे,गणेश बडनेरे,दिनेश तेलंग्रे, शेख सादिक मनियार आदींचा समावेश होता.

सदर बैठक यशस्वी करण्यासाठी ज्ञानेश्वर मोरे, किरण शेठ श्रीवास्तव, अमोल पाखरे आणि नरेंद्र कानडे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व परिचय महेंद्र बेराड यांनी केले, तर आभार प्रदर्शन संदीप काटोले यांनी केले.

बैठकीत ओबीसी समाजाने संघटितपणे आगामी निवडणुकीत निर्णायक भूमिका बजावण्याचा ठाम निर्धार व्यक्त केला.