पारध जिल्हा परिषद गटासाठी श्री महेंद्र बेराड सर – तरुण, लोकाभिमुख आणि विकासाभिमुख चेहरा

पारध जिल्हा परिषद गटासाठी श्री महेंद्र बेराड सर – तरुण, लोकाभिमुख आणि विकासाभिमुख चेहरा

 

पारध (प्रतिनिधी):

भोकरदन तालुक्यातील पारध जिल्हा परिषद गटात सध्या श्री महेंद्र बेराड सर यांचे नाव सर्वत्र चर्चेचा विषय बनले आहे. सामाजिक प्रश्न असो वा सर्वसामान्यांच्या अडचणी — तत्परतेने हाताळणारे, लोकांमध्ये सहज उपलब्ध होणारे, उच्चशिक्षित, निर्व्यसनी आणि सर्वपक्षीय कार्यकर्त्यांशी सुसंवाद राखणारे लोकाभिमुख व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे.

 

पारध शाहूराजे, पिंपळगाव रेणुकाई, लिहा, शेलुद, पारध खुर्द, सावंगी अवघडराव आणि वालसावंगी, पद्मावती परिसरात त्यांचे मित्रपरिवार, नातेवाईक आणि हितचिंतक सक्रिय असून, त्यांच्या बळावर महेंद्र बेराड सर विजयी होतील अशी चर्चा ग्रामस्थांमध्ये रंगली आहे.

 

श्री महेंद्र बेराड सर यांनी पारध गावात गेल्या सहा–सात वर्षांपासून आपल्या श्री गजानन कम्प्युटर्स सेंटरच्या माध्यमातून शेकडो विद्यार्थ्यांना विविध कोर्सेसचे कौशल्य प्रशिक्षण देत रोजगाराच्या संधी निर्माण केल्या आहेत. तसेच कॉमन सर्विस सेंटर च्या माध्यमातून ग्रामीण भागातील नागरिकांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी त्यांनी प्रभावी पाठपुरावा केला आहे.

 

त्यांनी शेतकऱ्यांना आधुनिक शेतीविषयी मार्गदर्शन, फवारणी ड्रोनचे प्रात्यक्षिक, तसेच युवकांना उद्योग व्यवसायाकडे वळवण्यासाठी प्रेरणा दिली. परिणामी काही युवकांनी स्वावलंबनाचा मार्ग धरला आहे.

 

याचबरोबर विविध वर्तमानपत्रातून भोकरदन तालुका प्रतिनिधी म्हणून पारध परिसरातील विविध सामाजिक प्रश्नांना त्यांनी वाचा फोडली आहे. त्यामुळे त्यांना लोकसंघर्ष पक्ष अध्यक्ष ॲड.योगेश माकने सर यांनी आपल्या पक्षाच्या भोकरदन तालुका अध्यक्षपदी त्यांची नियुक्ती केली आहे.पारध शाहूराजे परिसरात थोरले शाहू महाराज यांच्या स्मारक उभारणीसाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा करून एक विधायक भूमिका निभावली आहे. समाजसेवा, विकासकार्य आणि युवकवर्गाच्या प्रगतीसाठी त्यांचे समर्पित प्रयत्न पाहता जिल्हा परिषद निवडणुकीत श्री महेंद्र बेराड सर यांना संधी द्यावी, अशी मागणी स्थानिकांमधून जोर धरत आहे.

 

महेंद्र बेराड सर – तरुणाईचा आवाज, विकासाचा विश्वास!