रामजी महाविद्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती उत्साहात साजरी

रामजी महाविद्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती उत्साहात साजरी

 

सोयगाव (श्री महेंद्र बेराड तालुका प्रतिनिधी) :

सोयगाव तालुक्यातील रामजी महाविद्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती मोठ्या उत्साहात आणि आदरभावनेने साजरी करण्यात आली. या कार्यक्रमात विद्यार्थी, प्राध्यापक व कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले.

 

कार्यक्रमाची सुरुवात महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. परमेश्वर नेवरे सर यांच्या हस्ते गांधीजींच्या प्रतिमेचे पूजन करून झाली. त्यानंतर गांधीजींच्या विचारांवर आधारित काही मान्यवरांची भाषणे झाली.

 

प्राचार्य नेवरे सरांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात महात्मा गांधींचे जीवनचरित्र, त्यांच्या सत्याग्रह, अहिंसा व स्वावलंबन या तत्वांवर प्रकाश टाकला. त्यांनी सांगितले की, “गांधीजींनी दाखवून दिलेल्या मार्गाने देश आजही एकतेने पुढे जात आहे. त्यांच्या विचारांचा वारसा आपल्या पिढ्यांनी जपायला हवा.”

 

यावेळी प्रा. व्ही. डी. पवार, डी. के. नेवरे, एस. यू. कन्नर व आर. एन. सय्यद यांचीही भाषणे झाली. त्यांनी गांधीजींच्या सामाजिक, राजकीय व शैक्षणिक योगदानाचा आढावा घेतला.

 

शेवटी सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत स्वच्छतेची शपथ घेण्यात आली. प्रा. एस. यू. कन्नर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तर प्रा. आर. एन. सय्यद यांनी सूत्रसंचालन केले. आभार प्रदर्शन प्रा. डी. के. नेवरे यांनी केले.

 

या प्रकारे रामजी महाविद्यालयात गांधी जयंती साजरी करून गांधीजींचे विचार पुन्हा एकदा जागवले गेले.