दवाखान्याचं देउळ झालं,चिमित्कार झाला… देवमाणूस देवळात आला, तिसगावच्या दवाखान्यातील घटना ?

दवाखान्याचं देउळ झालं,चिमित्कार झाला… देवमाणूस देवळात आला, तिसगावच्या दवाखान्यातील घटना ?

 

(सुनिल नजन “चिफब्युरो” स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा) या बाबतची घटना अशी की मंगळवार दिनांक २३सप्टेंबर रोजी सकाळी बबनराव पाटीलबा मरकड राहणार मढी, तालुका पाथर्डी, जिल्हा अहिल्यानगर (तिसगाव येथील समर्थ कृषी सेवा केंद्राचे संचालक) हे पायाला जखम झाली म्हणून धनुर्वात प्रतिबंधक लसीचे इंजेक्शन घेण्यासाठी तिसगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात गेले होते.लसीचे इंजेक्शन घेत असताना त्यांच्या गळ्यातील तिनलाख रुपये किंमतीची सोन्याची चैन दवाखान्यातील खाटेवर पडली होती.ती लस देणाऱ्या परीचारीकेला ही दिसली नाही. दवाखाना बंद करीत असताना दवाखान्यातील (शिपाई) संजय वामनराव बळीद (मामा) राहणार चितळी,तालुका पाथर्डी, जिल्हा अहिल्यानगर यांच्या नजरेस पडली.ती घेऊन त्यांनी दवाखान्यातील कपाटात ठेवून दिली.बबनराव मरकड हे घरी गेल्यावर त्यांच्या लक्षात ही गोष्ट आली.ते अत्यंत बेचैन झाले होते.शेतातील काम करत असताना अंगठी घरातील टेबलावर ठेवली.आणि चैन गळ्यात घालण्या ऐवजी पॅंटच्या खिशात टाकली होती. बुधवारी सकाळी तिसगाव येथील समर्थ कृषी सेवा केंद्राच्या दुकान परीसरातील आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील सर्व सीसीटीव्ही कॅमेरे तपासले पण चैन चा कोठे ही थांगपत्ता लागला

नाही.गुरूवारी सकाळी मरकड यांनी भीत भीत सरकारी दवाखान्यातील संजय बळीद यांच्या कानावर चैन हरवल्याची गोष्ट सांगितली.संजय बळीद हे धार्मिक वृत्तीचे असुन त्यांना त्यांच्या सौभाग्यवती ने सांगितले होते की परमेश्वराने आपल्याला काही कमी केले नाही एखाद्याचा तळतळाट आपल्या घरात नको ज्यांची साखळी आहे त्यांना परत सुपुर्द करा म्हणून सांगितले.दुसऱ्या दिवशी जेव्हा मरकड यांनी या संदर्भात संजय बळीद यांच्या कडे विचारणा केली असता त्यांनी लगेच चैन सापडली म्हणून मरकड यांना सांगितले.मरकड हे भटक्यांची पंढरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या कान्होबाची मढी येथिल रहीवाशी असुन मढीचा चैतन्य कानिफनाथ माझ्या पाठीशी आहे असे सांगून त्यांनी देवाचे आभार मानले.आजच्या कलियुगात जिकडं तिकडं नुसती लबाडी, ब्लॅकमेलींग, टक्केवारी, भ्रष्टाचार,खोटारडेपणा दिसत आहे. पण बळीद मामाच्या इमानदारीने मला देवच दिसला. “भगवान के यहा देर है,लेकिन अंधेर नहीं” असं बबनराव मरकड यांनी सांगितले.या निमित्ताने जुन्या काळातील गाण्याच्या ओळी आठवल्या त्या अशा “धरमशाळेत देउळ झालं,चिमित्कार झाला,देव माणूस देवळात आला…(देव माणूस दवाखान्यात आला),या उजाड माळावरती, माझ्या देवानं केली पिरती,फुलबागेच रुप पाहूनी, हरपून जीव गेला, देव माणूस देवळात आला… गेला अंधार सरली रात्र,नारायणाचा फिरला हात, दळिंदराच्या अंगावरती किरणांचा शेला, देव माणूस देवळात आला… वस्ती वाडी खुली झोपडी,मायलेका ही यडी बागडी, भगवंतान भोळेपणाचा , उद्धार लई केला, देव माणूस देवळात आला… देव माणूस दवाखान्यात आला. संजय बळीद मामा यांना ईमानदारी साठीचे बबनराव मरकड यांनी मोठ्या स्वरूपात बक्षीस द्यावे अशी विनंती तिसगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्या मार्फत करण्यात येत आहे.