डॉ. दिनाजीराव खंदारे यांना शहीद वीर भगतसिंग राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित 

डॉ. दिनाजीराव खंदारे यांना शहीद वीर भगतसिंग राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित

 

 

अजिंठा ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. दिनाजीराव खंदारे यांना अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती आणि ब्रिक्स ह्यूमन राईट्स मानव अधिकार मिशन यांच्या संयुक्त विद्यमाने देण्यात येणारा शहीद वीर भगतसिंग राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. लातूर येथे नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रीय अधिवेशनात राज्यभरातून निवडण्यात आलेल्या प्रामाणिक व निःस्वार्थी सेवेतील अधिकारी आणि सेवाभावी व्यक्तींना या पुरस्काराने गौरवण्यात आले.

 

डॉ. खंदारे यांचे कार्य हे सिल्लोड तालुक्यातील आरोग्यसेवेसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरले आहे. कोरोना काळात त्यांनी केवळ आपल्या कर्तव्यापुरतेच मर्यादित न राहता, स्वतःहून घरोघरी जाऊन ज्येष्ठ नागरिक, अपंग व आजारी व्यक्तींना विनामूल्य आरोग्य सेवा दिली. “डॉक्टर म्हणजे देव”, हे उदाहरण त्यांनी प्रत्यक्ष कृतीतून समाजासमोर ठेवले आहे.ते

 

गेली अनेक वर्षे अजिंठा आणि सोयगाव ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून काम करत आहेत. या काळात त्यांनी एकाही रुग्णाकडून किंवा त्यांच्या नातेवाइकांकडून कोणतीही फी न घेता निस्वार्थ सेवा केली आहे. त्यांच्या या प्रामाणिक आणि उत्कृष्ट सेवेसाठी त्यांना हा राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

 

आज दिनांक २८ सप्टेंबर २०२५ रोजी अजिंठा येथे झालेल्या विशेष कार्यक्रमात राष्ट्रीय संघटक श्री. अरुण चव्हाण देशमुख यांच्या हस्ते डॉ. खंदारे यांना सन्मानपत्र, शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.या

 

वेळी नेत्ररोग अधिकारी श्री. योगेश सोनटक्के, प्रयोगशाळा तंत्रज्ञ गणेश मांगुळकर, नितीन खडके, मेलनर्स ब्रदर रोहित राव, उज्वल वाघमारे, नितीन गजबे, शुभम पाटील, लक्ष्मीबाई महाले मावशी, मुकेश देशमुख, ममता ताई, राजू झलवार (डाटा एंट्री ऑपरेटर, प्रा. आरोग्य केंद्र शिवना) आणि इतर मान्यवरांची उपस्थिती होती.

 

डॉ. दिनाजीराव खंदारे यांचा हा सन्मान संपूर्ण सोयगाव/ सिल्लोड तालुक्यासाठी आणि आरोग्य विभागासाठी अभिमानास्पद आहे.