पाचोरा भाजपा तर्फे 24 रोजी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिर
पाचोरा-
भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त येथील भारतीय जनता पार्टी व भाजपा महिला मोर्चा तर्फे बुधवार, दिनांक 24 सप्टेंबर 2025 सकाळी 10 वाजता “स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन” शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. स्वामी लॉन्स, गजानन पेट्रोल पंप शेजारी, पाचोरा येथे हे मार्गदर्शन शिबिर आयोजित केले आहे. या निमित्ताने गरुड झेप अकॅडमी (छत्रपती संभाजी नगर) चे संस्थापक अध्यक्ष डॉ. सुरेश सोनवणे हे इ. 10 वी व 12 वी च्या विद्यार्थ्यांना “सरकारी अधिकारी बनण्याची गुरुकिल्ली” या विषयावर मार्गदर्शन करतील.
माजी आमदार दिलीपभाऊ वाघ, युवा नेते अमोलभाऊ शिंदे, मा. वैशालीताई सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी पाचोरा तर्फे “सेवा पंधरवाडा” हा उपक्रम सुरू आहे. या उपक्रमाचा एक भाग म्हणून मतदार संघातील उदयोन्मुख विद्यार्थ्यांना भविष्यातील करियर घडविण्यासाठी डॉ. सुरेश सोनवणे यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरणार आहे. आगामी पोलीस भरती, संरक्षण दलातील नोकऱ्यांची संधी, तसेच केंद्र व राज्य शासनाच्या शासकीय नोकऱ्यांची तयारी कशी करावी.? या विषयावर डॉ. सोनवणे मार्गदर्शन करणार आहेत. पाचोरा भडगाव मतदार संघातील भाजपाचे सर्व पदाधिकारी याप्रसंगी उपस्थित राहणार असून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन भा.ज.पा.चे शहराध्यक्ष दीपक माने व भा.ज.पा. महिला मोर्चा शहराध्यक्ष ज्योतीताई चौधरी यांनी केले आहे.