अभ्यासिकेसाठी कृतज्ञता निधी चे आवाहन

अभ्यासिकेसाठी कृतज्ञता निधी चे आवाहन

 

मुंबई – २१ सप्टेंबर : श्री महेंद्र बेराड ( प्रतिनिधी)गेली ७ दशकं विद्यार्थी उत्कर्ष मंडळ गिरणगावात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत आहे. या मंडळाचे सन २०२८-२९ हे अमृत महोत्सवी वर्ष आहे. या अमृत महोत्सवानिमित्त मंडळाने विभागातील विद्यार्थ्यांसाठी स्वतःची अभ्यासिका घेण्याचा प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पाची सुरुवात म्हणून अभ्यासिकेसाठी भायखळा विभागात म्हाडाने स्वामी इमारतीत २ सदनिका देण्याचे मान्य केले आहे; मात्र या अभ्यासिकेसाठी फार मोठ्या प्रमाणावर निधीची आवश्यकता आहे. याशिवाय संस्थेच्या लालबाग,ना. म. जोशी तसेच सातरस्ता विभागात ही भविष्यात अभ्यासिकेसाठी जागा घेण्याचे नियोजित आहे. त्यासाठी संस्थेमार्फत आपल्या सभासदांना संपर्क करीत आहे मात्र विभागाबाहेरील नागरिकांनी या प्रकल्पासाठी आम्हांस कृतज्ञता निधी म्हणून आर्थिक सहकार्य करावे असे आवाहन मंडळप्रमुख विकास शिंदे यांनी केले आहे.

 

अधिक माहितीसाठी संपर्क

मंडळ प्रमुख – विकास शिंदे – ९८७०४२२९५९