रामजी महाविद्यालय, सोयगाव येथे मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन उत्साहात साजरा

रामजी महाविद्यालय, सोयगाव येथे मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन उत्साहात साजरा

 

सोयगाव (महेंद्र बेराड): सोयगाव तालुक्यातील वाल्मिकी शिक्षण, क्रीडा व बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचालित रामजी महाविद्यालय, सोयगाव येथे मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन उत्साहात व देशभक्तीच्या वातावरणात साजरा करण्यात आला.

 

कार्यक्रमाची सुरुवात संस्थेचे सचिव श्री. डी. के. नेवरे यांच्या हस्ते प्रतिमापूजनाने करण्यात आली. त्यानंतर महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. परमेश्वर कि. नेवरे यांच्या हस्ते ध्वजपूजन व ध्वजारोहण पार पडले.

 

या प्रसंगी प्राचार्य श्री. नेवरे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “मराठवाडा मुक्तीसंग्राम हा जनतेच्या शौर्य, बलिदान आणि संघर्षाचा इतिहास आहे. या संग्रामात ज्यांनी आपले प्राण अर्पण केले त्यांचे स्मरण सदैव आपण करत राहिले पाहिजे.” असे ते म्हणाले.

 

कार्यक्रमास महाविद्यालयाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी प्रा. व्ही. डी. पवार, प्रा. आर. एन. सय्यद, प्रा. एस. यू. कन्नर यांच्यासह इतर शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.

 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. आर. एन. सय्यद यांनी केले, तर सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. एस. यू. कन्नर यांनी केले.