कासार पिंपळगाव, जवखेडे खालसा, हनुमान टाकळी, कोपरे,वाघोली परीसरात आपत्कालीन पुरग्रस्त परिस्थिती

कासार पिंपळगाव, जवखेडे खालसा, हनुमान टाकळी, कोपरे,वाघोली परीसरात आपत्कालीन पुरग्रस्त परिस्थिती

 

(सुनिल नजन “चिफब्युरो” स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा) बीड जिल्ह्यातील आष्टी आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील अनेक गावांना ढगफुटीचा तडाखा बसल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. पिकांचा हातातोंडाशी आलेला पिकांचा घास निसर्गाच्या कोपाने मातीला मिळाला आहे.गर्भगिरीच्या डोंगर रांगावरील कडा,माणिक दौंडी,तांडावस्ती, शिरसाठवाडी,मढी,धामणगाव, सावरगाव, घाटशिरस,व्रुद्धेश्वर,देवराई,करंजी, सातवड, देवराई तिसगाव,मांडवे या परीसरात जोरदार अतीव्रुष्टी झाल्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे.वरील गावातील अनेक घरात,दुकानात, वाड्यात, मंदिरात,पिकात पाणी घुसल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे.अनेक शेतकऱ्यांचे पशुधन पुराच्या पाण्यात वाहून गेले आहेत.कासार पिंपळगावातील मधला मळा या नदीकाठच्या भागात अनेक नागरिक पुराच्या पाण्यात अडकून पडले होते.गावच्या सरपंच मोनालीताई राजळे,ग्रामसेवक प्रमोद म्हस्के, सदस्य अप्पासाहेब राजळे,राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शिवशंकर राजळे,संदिप राजळे,तलाठी , सर्कल यांनी परीस्थिती वर नियंत्रण ठेवूण गावातील भिल्ल समाजाचे कार्यकर्ते भाऊसाहेब माळी, मच्छिंद्र माळी, गोविंद माळी, गोपनीय माळी,बाळू माळी, अंकुश माळी, शिवाजी गायकवाड,संतोष माळी,कडूबापू माळी,गणेश माळी,दत्तू निकम, अविनाश माळी, सोमनाथ माळी, रविंद्र मोरे,पिंटू माळी,सचिन मोरे,संतोष निकम,विनायक माळी,दिलीप माळी यांची टीम तयार केली.त्यांनी पाण्यातील मासेमारी साठीचा तराफा (चप्पू)तयार करून पुराच्या पाण्यात अडकलेल्या सतरा जणांना जेसीबी च्या मदतीने सुरक्षित ठिकाणी हलविले.त्यांना गावातील अनेक तरूणाचा दोरखंड साखळीद्वारे चांगला आधार मिळाला.पुरातून सुरक्षित ठिकाणी येताच आपदग्रस्तांना अश्रू अनावर झाले होते.हनुमान टाकळी येथे नव्याने स्थापन झालेल्या ग्राम परीवर्तन कमेटीने पुराच्या पाण्यात अडकलेल्या ग्रामस्थांना ट्रॅक्टरचा वापर करून सुरक्षित ठिकाणी हलविले आणि गावात जेवणाची व्यवस्थाही केली.यामध्ये मनोज जरांगे पाटलांना मुंबईला पाठींबा देणाऱ्या युवकांचा विषेश समावेश होता.कोपरे येथे मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांच्या शेतात पाणी घुसल्याने पिकांची नासाडी झाली.मळगंगा देवीच्या मंदिराला पाण्याने वेढा दिला होता.गावाला पाणीपुरवठा करणारी ग्रामपंचायतीची विहीर संपूर्ण पाण्याखाली गेली होती.माजी सरपंच रमेश आव्हाड यांच्या घरालाही पाण्याने वेढा दिला होता.जवखेडे खालसा येथील डागातील देवी परीसरात आंधळे वस्तीजवळील मागासवर्गीय कुरणवस्ती वरील अनेक कुटुंबातील ग्रामस्थांना सरकारी पथकाने सुरक्षित ठिकाणी हलविले.तलाठी आणि सर्कल यांनी विशेष सहकार्य केले.वाघोली येथील कुरण वस्तीवरील मागासवर्गीय कुटुंबाला पाण्याने वेढा दिला होता.पण सर्व जण सुरक्षित ठिकाणी हलविले गेले.पण अनेक घरात पुराचे पाणी शिरले होते. एकंदरीत या पुरामध्ये शेतकऱ्यांच्या गाया,म्हशी, कोंबड्या,शेळ्या, ट्रॅक्टर,ट्राॅली,पिक अप गाडी,अन्न धान्य हे वाहुन गेले.उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.गावाला जोडणारे अनेक रस्ते पुराच्या पाण्याने वाहून गेले.अनेक बंधारे फूटले.सरकारने पूरग्रस्त गावातील नदीकाठच्या शेत जमिनीचे सरसगट पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीची मदत द्यावी अशी आपदग्रस्तांची मागणी आहे.काही अडचण असल्यास शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघाच्या लोकप्रिय आमदार मोनिकाताई राजळे, तहसीलदार, शेवगाव/पाथर्डी, पोलिस निरीक्षक, शेवगाव/पाथर्डी यांच्या मोबाईल वर संपर्क साधावा असे आवाहन शासनाच्या वतीने करण्यात आले आहे.