गो से हायस्कूल येथील उपशिक्षक श्री संजय दत्तू सर यांचा सेवापूर्ती सोहळा संपन्न
पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित गो से हायस्कूल पाचोरा येथे कार्यरत असलेले उपशिक्षक श्री संजय सिताराम दत्तू सर यांचा सेवापूर्ती सोहळा स्वामी लॉन्स पाचोरा येथे संपन्न झाला. विज्ञान विषयासाठी अध्यापन करत दि. ३१ ऑगस्ट रोजी अठ्ठावीस वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर दत्तू सर सेवानिवृत्त झाले आहेत. त्या निमित्त नमस्ते ग्रुप पाचोरा तर्फे त्यांचा सेवापूर्ती सोहळ्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. श्री संजय दत्त यांचे शैक्षणिक क्षेत्रात मोलाचे योगदान आहे. तसेच त्यांच्या पत्नी श्रीमती सविता संजय दत्तू या पि के शिंदे हायस्कूल पाचोरा येथे उपशिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. यासह मुलगा व मुलगी वैद्यकीय तथा अभियांत्रिकी क्षेत्रात शिक्षण घेत आहेत. श्री संजय दत्तू यांच्या सेवापूर्ती सोहळ्यात शैक्षणिक, सामाजिक तथा राजकीय क्षेत्रातील विविध मान्यवरांसह गो से हायस्कूल, पि के शिंदे, पाचोरासह परिसरातील विविध शाळेतील स्टाफ तथा स्नेहीजन व अप्तेष्ट मित्र परिवाराने भेट देत श्री दत्तू यांना सेवापूर्तीच्या शुभेच्छा दिल्या. यात इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनींतर्फे निवृत्तीच्या शुभेच्छा देताना त्यांच्या भावना अनावर होऊन या विद्यार्थ्यांना रडू कोसळले हा प्रसंग सर्वांच्या मनाला स्पर्श करत संजय दत्तू यांच्या शैक्षणिक वाटचालीतील विद्यार्थ्यांप्रतीची आत्मीयता दर्शवणारा ठरला. प्रसंगी उपस्थितांतर्फे दत्तू सर यांच्या अठ्वठावीस वर्षाच्या सेवेत शिक्षण संस्था, शाळा तथा विद्यार्थ्यांप्रती दिलेल योगदान याविषयी भावना व्यक्त करत त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला. श्री दत्त संजय दत्त यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना सर्वांच्या शुभेच्छांचा स्वीकार करत आपल्या शैक्षणिक वाटचालीत आपण नक्कीच सकारात्मक कार्य केल्याने आज ही माझ्या कार्याची पावती असल्याचे मनोगत व्यक्त केले.