जोगेवाडी येथे अंमली पदार्थ विरोधी व्याख्यान देऊन,लगेच छापा टाकून २ लाख १८ हजार १६० रुपये किंमतीचा अवैध दारू साठा जप्त,एक जण ताब्यात.पाथर्डी पोलिसांच्या धडाकेबाज कामगिरीमुळे दोन नंबर धंद्यावाल्यांचे धाबे दणाणले

जोगेवाडी येथे अंमली पदार्थ विरोधी व्याख्यान देऊन,लगेच छापा टाकून २ लाख १८ हजार १६० रुपये किंमतीचा अवैध दारू साठा जप्त,एक जण ताब्यात.पाथर्डी पोलिसांच्या धडाकेबाज कामगिरीमुळे दोन नंबर धंद्यावाल्यांचे धाबे दणाणले

 

(‌‌सुनिल नजन “चिफब्युरो”स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा) आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ दिनाच्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रात जनजागृती विषयक कार्यक्रमातून व्यसनमुक्ती संदर्भात व्याख्यान देऊन सर्व सामान्य लोकांना जागृत करण्यासाठी पोलिस खाते सतर्क झाले आहे.त्याचाच एक भाग म्हणून अहिल्या नगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील जोगेवाडी येथे अंमली पदार्थ विरोधी व्याख्यान दिले आणि लगेचच छापा टाकून २लाख१८हजार१६० रुपये किंमतीचा देशी विदेशी कंपनीचा अवैध दारू साठा जप्त करण्यात आला आहे. पाथर्डी पोलिसांनी धडाकेबाज कामगिरी करून एका म्होरक्या ला ताब्यात घेऊन त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. या बाबत मिळालेली माहिती अशी की दिनांक १७ ऑगष्ट २०२५ रोजी रात्री सात वाजण्याच्या सुमारास पाथर्डी पोलिस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक विलास पुजारी साहेब यांना गुप्त खबऱ्या मार्फत माहिती मिळाली होती की धनंजय बाबासाहेब बडे ,राहणार जोगेवाडी, तालुका पाथर्डी, जिल्हा अहिल्यानगर हा त्याची स्विफ्ट गाडी क्रमांक एम एच ०१ ए आर १३०० या गाडीमध्ये देशी विदेशी दारूचा साठा विक्री करण्याच्या उद्देशाने वाहतूक करीत आहे.ही माहिती मिळाल्यानंतर पाथर्डी पोलिस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक विलास पुजारी साहेब यांनी लगेचच सदर गाडीचा शोध घेतला असता त्यांना सदर गाडी ही पाथर्डीच्या विश्रामगृहा समोरील रोडवर आढळून आली.दोन पंचा समक्ष त्या गाडीवर छापा टाकून त्या गाडीची झाडाझडती घेतली असता त्या गाडीत पाथर्डी पोलिसांना देशी विदेशी कंपनीचा १४८ बाटल्यांमध्ये अवैध दारू साठा आढळून आला. सदर गाडी चालकाचे नाव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव धनंजय बाबासाहेब बडे, राहणार जोगेवाडी, तालुका पाथर्डी,जिल्हा अहिल्यानगर असे सांगितले.सदर दारूच्या लायसन्स बाबद माहिती विचारली असता त्यानें उडवा उडवीची उत्तरे दिली.मग पाथर्डी पोलिसांनी संशयित आरोपीला ताब्यात घेऊन त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. अवैध दारू साठा आणि गाडीसह एकूण दोन लाख आठरा हजार एकशे साठ रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.सदरची कारवाई ही अहिल्यानगर जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे साहेब अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्मे साहेब आणि शेवगाव विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश उगले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पाथर्डी पोलिस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक विलास पुजारी साहेब यांच्या आदेशानुसार पोलिस सब इन्स्पेक्टर महादेव गुट्टे,पोलिस हेड कॉन्स्टेबल संदिप कानडे, संदिप बडे,इजाज सय्यद, संजय जाधव यांच्या पथकाने केली आहे. ही कारवाई करण्या अगोदर जोगेवाडी येथे जाऊन पोलिस निरीक्षक विलास पुजारी साहेब यांनी ग्रामस्थांना चांगले अंमली पदार्थ विरोधी जनजागृती विषयक व्याख्यान दिले.आणि मग ही धडक कारवाई केली आहे.त्यामुळे पाथर्डी तालुक्यात अवैध धंदे करणारांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.कारण पाथर्डी तालुक्यात अनेक ठिकाणी चोरी चोरी,चुपके चुपके राजरोसपणे दारू विक्री होत आहे.याचा सुगावा पोलिस प्रशासनाला लागला असुन अनेक जण पाथर्डी तालुक्यातील पोलिसांच्या रडारवर आहेत.