हनुमान टाकळी येथील समर्थ हनुमान देवस्थान समिती आणि निव्रुत पोलिस अधिकारी सुभाषराव दगडखैर यांच्यातील चाळीस वर्षांपासूनचा जागेचा वाद पोलिस निरीक्षक विलास पुजारी साहेब यांनी चाळीस मिनिटात मिटविला 

हनुमान टाकळी येथील समर्थ हनुमान देवस्थान समिती आणि निव्रुत पोलिस अधिकारी सुभाषराव दगडखैर यांच्यातील चाळीस वर्षांपासूनचा जागेचा वाद पोलिस निरीक्षक विलास पुजारी साहेब यांनी चाळीस मिनिटात मिटविला

 

 

 

 

(सुनिल नजन “चिफब्युरो” स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा) रस्त्यावरून जाण्या येण्यासाठी जागेचे वाद सर्वत्र निर्माण झालेले आहेत.त्यामुळे महसूल मंत्री नामदार चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांनी शेत वहीवाटीचे रस्ते,पाणंद रस्ते,शिवरस्ते त्वरित मोकळे करण्यासाठी तहसीलदार आणि प्रांताधिकारी यांना सुचना देण्यात आलेल्या आहेत.त्यामुळे सर्वच ठिकाणी असलेल्या रस्त्याच्या वहीवाटीचे वाद निकाली काढण्यात येत आहेत. असाच एक गेल्या चाळीस वर्षापासूनचा जागेचा वाद निकाली काढण्यात आला आहे.अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील श्रीक्षेत्र हनुमान टाकळी येथील समर्थ हनुमान देवस्थान समिती आणि निव्रुत पोलिस अधिकारी सुभाषराव भास्करराव दगडखैर यांच्यामध्ये देवस्थानच्या संरक्षक भिंतीवरून हा वाद सुरू होता.संपुर्ण देशातील भाविक भक्तांचे श्रद्धास्थान म्हणून प्रसिद्ध असलेल्या आणि स्वर्गीय पुजनीय वैकुंठवासी माधव स्वामी यांच्या पदस्पर्शाने सुरुवात झालेल्या समर्थ हनुमान देवस्थानचे बांधकाम अत्यंत प्रगतीपथावर आहे.परंतु समर्थ हनुमान देवस्थान समिती यांनी सुभाष भास्कर दगडखैर यांच्या विरोधात पाथर्डी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार अर्ज दाखल केला होता.त्यावरून दिनांक ४/८/२०२५ रोजी पाथर्डी पोलिस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक विलास पुजारी साहेब यांनी आपल्या फौजफाट्यासह श्रीक्षेत्र हनुमान टाकळी येथील हनुमान देवस्थानास भेट देऊन समर्थ हनुमान देवस्थान समितीचे सदस्य आणि सुभाषराव भास्कर दगडखैर यांच्यासह हनुमान टाकळी ग्रामस्थ यांच्यामध्ये समेट घडवून आणून सदरचा वाद हा कायमस्वरूपी मिटविला आहे.सदरचा वाद मिटवताना समर्थ हनुमान देवस्थानच्या पाठीमागिल दक्षिण दिशेकडील बाजूतील जागेत बांधण्यात येणारी दक्षिणोत्तर संरक्षक भिंत ही सुभाषराव भास्कर दगडखैर यांच्या इमारतीच्या पश्चिम दिशेकडील भींतीपासून पश्चिमेस पाच फूट अंतरावर निश्चित करण्यात आली असून समर्थ हनुमान देवस्थानच्या प्रदक्षिणा मार्गापासून दक्षिणेस पंधरा फुट अंतरावर तसेच सुभाषराव दगडखैर यांच्या इमारतीच्या उत्तर बाजूस असलेल्या जांभळीच्या झाडापासून उत्तरेस दोन फूट अंतरापर्यंत व समर्थ हनुमान देवस्थानच्या प्रदक्षिणा मार्गापासून दक्षिण पूर्व कोपऱ्यात पंधरा फुट अंतरापर्यंत अशी हनुमान देवस्थानच्या संरक्षक भिंतीची हद्द निश्चित करण्यात आल्याचे ठरले आहे. सदरच्या वादाचा समेट हा पाथर्डी पोलिस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक विलास पुजारी साहेब यांनी आणि समर्थ हनुमान देवस्थान समितीचे सर्व सदस्य व हनुमान टाकळी येथील समस्त ग्रामस्थ,तसेच सुभाषराव भास्करराव दगडखैर यांच्या उपस्थितीत दिनांक ४/८/२०२५ रोजी केला असुन सदरचा निर्णय हा भविष्यात हनुमान टाकळी येथे वरील कारणावरून कोणताही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही यासाठी घेण्यात आलेला आहे.सदरचा निर्णय हा हनुमान देवस्थान समिती आणि सुभाषराव भास्कर दगडखैर यांना मान्य असलेबाबद समर्थ हनुमान देवस्थान समिती हनुमान टाकळी तालुका पाथर्डी जिल्हा अहिल्यानगर यांनी समीतीचा ठराव केला आहे.तो ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आलेला आहे. असे पाथर्डी पोलिस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक विलास पुजारी साहेब यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमूद करण्यात आले आहे. सदर वादा संदर्भात हनुमान टाकळी येथील नवतरुण वर्गानी सोशल मीडियाच्या माध्यमातून एक पोस्ट शेअर केली होती त्यात असे म्हटले होते की हा वाद गावातील पुढाऱ्यांनी गावातच मिटविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे होते. पुर्वीच्या काळी गावाचे नेतृत्व करणारे स्व.आसाराम गायकवाड, सिताराम बर्डे गुरुजी, पोलिस पाटील सुर्यभान बर्डे,खंडूजी बर्डे, बाबुराव बर्डे, अर्जुनराव काजळे,म्हातारदेव दगडखैर, बाबाजी दगडखैर, बाबुराव दगडखैर, भास्करराव दगडखैर, हरीभाऊ नवगिरे, अंबादास बांदल, विठोबा दगडखैर, नामदेव मोरे प्रभाकर बावणे,शहाराम बलफे,आसाराम बलफे,असे अनेक नेते होऊन गेले त्यातील आजही जेष्ठ नेते नारायण तात्या काजळे आणि मोहनराव दगडखैर हे हयात आहेत.परंतू त्यांनी गावचे नेतृत्व करताना गावातील वाद हे गावातच मिटविण्यासाठी प्रयत्न केले होते.आणि आज किरकोळ वाद मिटविण्यासाठी थेट पोलिसांकडे तक्रार द्यावी लागली ही गावाच्या द्रुष्टीने निश्चितच भुषणावह बाब नाही अशी खंतही त्यांनी हाॅटसाप वर व्यक्त केली होती.आज मात्र देवस्थान समिती आणि दगडखैर परीवार यांच्यातील मिटलेला संघर्ष हा गावाच्या द्रुष्टीने एक ऐतिहासिक निर्णय म्हणावा लागेल. वैराने वैर वाढते आणि समेटाने मिटते अशी एक संकल्पना आहे.ती हनुमान टाकळी ग्रामस्थांनी प्रत्यक्षात साकार केली आहे.आणि गावाचे “श्रीक्षेत्र” हे नाव खरोखरच सार्थ केले आहे.चाळीस वर्षांपासूनचा वाद चाळीस मिनिटात मिटविला असल्याचे पाथर्डी पोलिस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक विलास पुजारी साहेब यांनी सांगितले आहे.