जवखेडे खालसा शिवारात 15,080 रूपयाची देशी विदेशी दारू जप्त तिन आरोपीच्या विरोधात स्वतंत्र 3 गुन्हे दाखल, पोलिस निरीक्षक विलास पुजारी यांची धडाकेबाज कारवाई
(सुनिल नजन चिफब्युरो स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा) जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे साहेब यांनी ज्या पोलिस स्टेशनच्या हद्दीत अवैध धंदे आढळून येतील त्या पोलिस निरीक्षकावरच कडक कारवाईचा बडगा उगारला जाईल असे निक्षून सांगितल्यामुळे जिल्ह्यातील सर्वच पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक खडबडून जागे झाले आहेत.जिल्ह्यातील सर्व पोलिस निरीक्षक स्वतः रात्री गाडीत बसून पेट्रोलींग करीत आहेत. आणि अवैध व्यवसायांची तपासणी करीत आहेत. कोठेही अवैध धंदे आढळून आल्यास प्रत्येकावरच स्वतंत्र गुन्हे दाखल करून आरोपीच्या मुसक्या आवळत आहेत.अशीच एक तातडीची कारवाई पाथर्डी तालुक्यात करण्यात आली आहे.दिनांक २० जूलै रोजी रात्री दहा वाजता पाथर्डी तालुक्यातील कोपरे-जवखेडे खालसा शिवारात पेट्रोलींग करीत असताना गावातील गुप्त खबऱ्या मार्फत माहिती मिळाली होती की तिसगाव मीरी रस्त्यावरील अनेक ठिकाणी अवैध रीतीने दारू विक्री होत आहे.मग पोलीसांनी मोहोजफाटा शिवारात अनेक ठिकाणी अवैध दारू साठयांचे अड्डे शोधत असताना पाथर्डी पोलीसांना जवखेडे खालसा, तालुका पाथर्डी, जिल्हा अहिल्यानगर येथील शिवारात १५०८० रूपये किमतीचा तिनं ठिकाणी देशी विदेशी कंपनीचा दारूचा साठा आढळून आला आहे.जवखेडे फाट्यावर प्रथम १)अफान अहमद शेख यांच्या कडे ५५४० रुपये किंमतीचा देशी विदेशी कंपनीचा अवैध दारू साठा आढळून आला होता. मग त्याच्या विरोधात पाथर्डी पोलिस स्टेशनमध्ये ७९२/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम ६५ ई अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.२)दुसरा साठा अन्सार सलीम शेख याच्याकडे ५५८० रुपये किंमतीचा देशी विदेशी कंपनीचा अवैध दारू साठा आढळून आला होता.मग त्याच्या विरोधात पाथर्डी पोलिस स्टेशनमध्ये ७९३/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम ६५ ई अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.३) तिसरा साठा नितीन केरू जाधव यांच्याकडे ३९६० रुपये किंमतीचा देशी विदेशी कंपनीचा अवैध दारू साठा आढळून आला होता.मग त्याच्या विरोधात पाथर्डी पोलिस स्टेशनमध्ये ७९४/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम ६५ ई अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिन्ही आरोपी कडून एकुण १५,०८० रुपये किंमतीचा अवैध दारू साठा जप्त करण्यात आला आहे.त्यामुळे अवैध धंदे करणाऱ्याचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.राज्यमार्गावर अनेक ठिकाणी अवैध दारू विक्री जोरात सुरू आहे अशी माहिती क्यू आरकोड मुळे जिल्हा पोलिस अधीक्षक यांना मिळाली आहे.”दारू विक्रेते करणार धार धार,आणि पोलिस निरीक्षक साहेब करणार एक बार”अवैध धंद्याविरोधात कडक कारवाई करून गैर मार्गाने व्यवसाय करणाऱ्यांची कोणत्याही प्रकारची गय केली जाणार नाही असे पोलिस निरीक्षक साहेब यांनी सींहगर्जना करीत अवैध व्यवसाय करणाऱ्यांना इशाराच दिला आहे.
सदरची कारवाई ही अहिल्यानगर जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे साहेब, अप्पर पोलीस अधीक्षक कलुबर्मे साहेब, शेवगाव विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी सुनिल पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पाथर्डी पोलिस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक विलास पुजारी साहेब, पोलिस सबइन्स्पेक्टर विलास जाधव साहेब, महादेव गुट्टे, पो.हे.काॅं.अभय लबडे, अल्ताफ शेख,पोलिस नाईक सुखदेव धोत्रे,गुंड,सागर बुधवंत, ज्ञानेश्वर ईलग,ईजाज शेख,गोफने यांच्या पथकाने केली आहे.
























