महाराष्ट्रातील 32 जिल्हा परिषदा, 336पंचायत समित्या,248 नगरपरीषदा, 42 नगरपंचायती, 29 महानगरपालीकेच्या निवडणुकीची लगिनघाई सुरू,10 जुलैला दुपारी 12 वाजता राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ऑनलाईन बैठकीचे आयोजन

महाराष्ट्रातील 32 जिल्हा परिषदा, 336पंचायत समित्या,248 नगरपरीषदा, 42 नगरपंचायती, 29 महानगरपालीकेच्या निवडणुकीची लगिनघाई सुरू,10 जुलैला दुपारी 12 वाजता राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ऑनलाईन बैठकीचे आयोजन

 

(सुनिल नजन “चिफब्युरो” स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा) महाराष्ट्रातील जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर पालिका आणि महानगरपालिका या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीची लगिनघाई आता जोरात सुरू झाली असून १० जुलै रोजी दुपारी बारा वाजता महाराष्ट्रातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांची निवडनुक आयोगाने व्हीडिओ काॅंन्फरंस द्वारे ऑनलाईन बैठक बोलावली आहे.या बैठकीमध्ये महाराष्ट्रातील 32 जिल्हा परीषदा, 336पंचायत समित्या, 248 नगरपरीषदा, 42 नगरपंचायती, आणि 29 महानगर पालीकांच्या निवडणुकीच्या संदर्भात राज्य निवडणूक आयुक्त व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे निवडणुक पुर्व तयारीचा विभाग निहाय आढावा या बैठकीत घेणार आहेत. तसेच या बैठकीस महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांनी उपस्थित रहावे असे परीपत्रकच राज्य निवडणूक आयोगाच्या वतीने उपायुक्त राजेंद्र पाटील यांनी राज्यातील सर्व विभागीय आयुक्तांकडे पाठवले आहे.तसेच या परीपत्रकात नमूद केलेली सर्व माहिती तयार करून ती राज्य निवडणूक आयोगास पीडीएफ फाईल मध्ये ईमेल द्वारे 9 जुलै 2025 पर्यंत सादर करण्यात यावी असे सदर परीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.या रकाण्यातील माहिती मध्ये तुमच्या जिल्ह्यात किती मतदान केंद्रे आहेत. निवडणुकीच्या दृष्टीने किती ईव्हीएम मशिन उपलब्ध आहेत.मतदान घेण्यासाठी अजुन किती ईव्हीएम मशिनची आवश्यकता आहे. अशा आशयाची सर्व माहिती पीडीएफ फाईल मध्ये भरून ईमेल आयडी द्वारे ऑनलाईन पद्धतीने सादर करण्यास सुचविण्यात आले आहे. एकीकडे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी राजकीय पक्षांनी कंबर कसली असून जोरात मोर्चेबांधणी सुरू केली आहे.तर दुसरीकडे निवडणूक आयोगानेही अंग झटकून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जोरदार तयारी सुरू केली असून लवकरच अचानक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची तुतारी वाजण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.या निवडणुकीसाठी दुसऱ्या फळीतील सर्वच राजकीय पक्षांचे कार्यकर्ते आता मतदारांच्या पायावर लोटांगण घालून होणाऱ्या निवडणूकीसाठी मीच कसा लायक आहे हे आता मतदारांना सांगत फिरत आहेत. काहींनी तर थेट आमदार, खासदार, मंत्री यांचे आता पासूनच पाय धरायला सुरुवात केली आहे. या निवडणुकीत आमच्या पक्षाने तिकीट नाही दिले तर आम्ही निश्चिंत बंडखोरी करून निवडणूक लढविण्याची भाषा काही मग्रूर कार्यकर्ते राजकीय नेत्यांना ऐकू जाईल अशा मोठ्या आवाजात पत्रकारा जवळ बोलत आहेत. होणाऱ्या निवडणुकीच्या आखाड्यात आतापासूनच हवसे नवसे गवसे हे निवडणुकीचे तिकीट मिळवण्यासाठी लबाड लांडग्यां सारखे जिबान धरून बसले आहेत.आकाशात पावसाळी मोसमी वारे वहात आहेत.आषाढ मेघांनी नभ आक्रमिले असतानाच आता निवडणुकीची धामधूम सुरू झाली असून युती आघाडी करण्याच्या पार्श्वभूमीवरही जोरदार राजकीय वादळी वारे वाहु लागले आहेत.सेनेचे दोन बंधू एकत्र येऊन राजकीय जुगलबंदीच्या कलगीतुऱ्याला आता पासूनच सुरूवात झाली आहे.