वडुले बुद्रुकच्या काळे वस्तीवरील अखंड हरिनाम सप्ताहात पुण्यातील प्रसिद्ध उद्योगपती बाळासाहेब काळे यांचा सन्मान सोहळा संपन्न
(सुनिल नजन “चिफब्युरो” स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा) पुण्यातील प्रसिद्ध उद्योगपती बाळासाहेब काळे यांचा अहिल्या नगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील वडुले बुद्रुक मधल्या काळे वस्तीवरील नाथनगरातील हनुमान मंदीरात झालेल्या अखंड हरिनाम सप्ताहात गावच्या वतीने भव्य दिव्य असा सन्मान सोहळा साजरा करण्यात आला.१८ मे रोजी झालेल्या सोहळ्यातील सांगता समारंभात हा सन्मान सोहळा संपन्न झाला. सन २०२६ सालातील अखंड हरिनाम सप्ताहाच्या शेवटच्या दिवसाच्या काल्याच्या महाप्रसादाच्या पंगतीचे अन्नदान उद्योगपती बाळासाहेब काळे यांच्या वतीने करण्यात येणार आहे. या निमित्ताने वडुले बुद्रुक ग्रामस्था तर्फे हा सन्मान सोहळा साजरा करण्यात आला. दिनांक 11 ते 18 मे 2025 या कालावधीत या अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते.सर्व ह.भ.प.आकाश महाराज नजन, किशोर महाराज खाडे, आदिनाथ महाराज सातपुते,गितामाई धसाळ, ज्ञानेश्वरी गुंजाळ,क्रुष्णा महाराज ताठे, संजय महाराज बिलवाल, यांची किर्तने झाली.ह.भ.प.उद्धव महाराज सबलस यांच्या काल्याच्या किर्तनाने या अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता झाली. वडुले बुद्रुक येथील रहिवासी असलेले परंतु सध्या पुणे येथे कार्यरत असलेले प्रसिद्ध उद्योगपती बाळासाहेब काळे यांचा ह.भ.प. उद्धव महाराज सबलस यांच्या हस्ते आणि ईतर सर्व ग्रामस्थांच्या उपस्थितीत हा मोठा सन्मान सोहळा साजरा करण्यात आला. या प्रसंगी विजय गणगे, ज्ञानेश्वर महाराज सबलस, शेवगाव क्रुषीउत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रदीप काळे, संतोष मामा चोपडे, काका महाराज डमाळ, सोमनाथ महाराज गुगळे, सुनिल महाराज कबाडी, रेवणनाथ महाराज सातपुते, बाळासाहेब महाराज कबाडी, हरीभाऊ महाराज हरवणे, शिवाजी महाराज शिंदे , कुंडलीक महाराज बुचकुल यांच्या सह वडुले बुद्रुक येथील काळे वस्ती वरील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रसंगी गुगळे परीवाराच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.