वीज कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नावर वर्कर्स फेडरेशनची क्रमबद्ध आंदोलनाची चारही वीज कंपन्यांच्या प्रशासनाला आंदोलनाची नोटीस

वीज कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नावर वर्कर्स फेडरेशनची क्रमबद्ध आंदोलनाची चारही वीज कंपन्यांच्या प्रशासनाला आंदोलनाची नोटीस

महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन संघटनेच्या वतीने,महाराष्ट्र राज्याच्या अत्यंत संवेदनशील वीज उद्योगात काम करणाऱ्या वितरण,पारेषण व निर्मिती या वीज कंपन्यातील ८६००० कर्मचारी,अधिकारी व अभिंयता यांचे प्रश्न गेले अनेक वर्षे व्यवस्थापना बरोबर सातत्याने पाठपुरावा करून चर्चेच्या माध्यमाने सुटावे हा प्रयत्न संघटनेने केला.अनेक वेळा कंपनीच्या व्यवस्थापनाने संघटने बरोबर बैठका घेऊन प्रलंबित प्रश्नावर चर्चा केली. बैठकीत झालेल्या निर्णयाचे कार्यवृत्त सुद्धा संघटनेस दिले.मात्र कार्यवृत्तावर अंमलबजावणी करण्यात आली नाही व ते प्रश्न आजही प्रलंबित असल्यामुळे तिन्ही वीज कंपन्यातील कामगारां मध्ये प्रशासनाच्या विरोधात प्रचंड असंतोष फिल्डवर निर्माण झालेला आहे. खालील प्रलंबित प्रश्नावर आमच्या संघटनेच्या केंद्रीय व झोनल सचिव पदाधिकारी यांची औरंगाबाद येथे दि.२९.१०.२०२३ रोजी झालेल्या बैठकीमध्ये विस्तृत चर्चा झाल्यानंतर आंदोलनाचा निर्णय खालील प्रलंबित प्रश्नावर घेण्यात आला. आंदोलनाची नोटीस ४ वीज कंपन्यांचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांना देण्यात आली आहे.आंदोलनाची प्रत मा. उपमुख्यमंत्री व ऊर्जामंत्री व मा.प्रधान ऊर्जा सचिव यांना देण्यात आली असून या विषयात तात्काळ लक्ष घालून शासन प्रशासन व संघटना प्रतिनिधी अशी त्रिपक्षीय बैठक आयोजिन करून प्रश्न सोडवावे असे आवाहन करण्यात आलेले आहे.
*कर्मचारी,अधिकारी,अभियंते व आउटसोर्सिंग कर्मचारी, सुरक्षारक्षक यांचे प्रलंबित प्रश्न*

१) थकबाकी व वीज बिल वसुली करीता स्वतंत्र यंत्रणा निर्माण करावी.
२) तांत्रिक व अतांत्रिक कर्मचाऱ्याकरीता कामगार कायद्यात निश्चित केल्याप्रमाणे ८ तासच काम घ्यावे.
३) अंतर्गत भरती करीता राखीव असलेल्या पदाची जाहिरात तात्काळ प्रसिद्ध करावी.
४) महावितरण कंपनीतील तांत्रिक कर्मचाऱ्यांना पूर्वलक्षी प्रभावाने वाहन भत्ता १ एप्रिल २०१८ पासून मंजूर करण्याबाबत.
५) तिन्ही वीज कंपन्यातील ४३ हजाराच्या वर रिक्त जागा भरण्याची प्रक्रिया सुरू करून कालबद्ध कार्यक्रम जाहीर करून पूर्ण करावी.
६) तिन्ही वीज कंपनीतील कंत्राटी व आऊटसोर्सिंग कामगार सुरक्षारक्षकांना कायम करण्याचा निर्णय जाहीर करावा.
७) तिन्ही वीज कंपनीतील सर्व विभागातील कर्मचाऱ्याचे वर्क्स नामर्स निश्चित करावे.
८) शाखा,उपविभाग,विभाग कार्यालयात महावितरण कंपनीने निश्चित केलेल्या नार्मस नुसार अतिरिक्त पदांना मंजुरी द्यावी.शाखा व उपविभाग निर्माण करावे.
९) महावितरण कंपनीने सुरू केलेली इन पॅनेलमेंट पद्धत पूर्णपणे बंद करावी.
१०) दिनांक १.४.२०१९ नंतर तयार झालेल्या उपकेंद्रा मध्ये सुरू असलेली ठेकेदारी पद्धत तात्काळ बंद करून यंत्रचालक प्रवर्गातील पदे निर्माण करुन भरण्यात यावी.
११) दि.०१.०४.२०१५ च्या राज्य सरकारच्या सेवा उपदान कायद्यानुसार तिन्ही वीज कंपन्यातील कर्मचाऱ्यांना सेवा उपदान देण्यात यावे.
१२) तिन्ही वीज कंपन्यातील कर्मचारी,अभियंते अधिकारी यांना राज्य शासनाने मंजूर केलेली पेन्शन योजना लागू करावी.
१३) पनवेल,जालना व पुणे महानगरपालिका कार्यक्षेत्रातील शाखा कार्यालयाकरिता कनिष्ठ कार्यालयीन सहायकाचे पदे निर्माण करावी.
१४) सर्व सहाय्यकाचा ३ वर्षाचा कालावधी सामान्य-७४ व सेवाउपदानाच्या  लाभाकरीता गृहीत धरावा.
१५) मयत कामगाराच्या वारसाचे प्रलंबित प्रकरणे तात्काळ निकाली काढावी.
*क्रमबद्ध आंदोलन खालील प्रमाणे*
१) आंदोलनाचा पहिला टप्पा:- दि.१४ डिसेंबर २०२३ रोजी महाराष्ट्रातील सर्व मडंळा कार्यालया समोर द्वारसभा व निदर्शने.
२) आंदोलनाचा दुसरा टप्पा:-दि.२२ डिसेंबर २०२३ रोजी महाराष्ट्रातील सर्व झोन कार्यालया समोर द्वारसभा व तीव्र निदर्शने.
३) आंदोलनाचा तिसरा टप्पा दि.२८ डिसेंबर २०२३ रोजी  प्रकाशगड/प्रकाशगंगा समोर विशाल धरणे व मोर्चा.
वरील सर्व प्रलंबित विषयावर आपल्या पातळीवर चर्चा होऊन प्रश्न सुटावे अशी सघटनेचे अपेक्षा आहे. प्रश्न न सुटल्यास नाईलाजाने संघटनेला आंदोलन करावे लागेल व आंदोलनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीत सरकार व व्यवस्थापन जबाबदार राहील. महाराष्ट्रातील सर्व संघटनेचे पदाधिकारी व सभासद यांनी जोरदार आंदोलनाची तयारी सुरू करावी असे आव्हान संघटनेच्या वतीने कॉम्रेड मोहन शर्मा अध्यक्ष, सी.एन.देशमुख कार्याध्यक्ष, कृष्णा भोयर सरचिटणीस, महेश जोतराव अतिरिक्त सरचिटणीस, कॉम्रेड बी.एल.वानखेडे,एस.आर.खतिब,सी.एम.मौर्य, एन.डी.सगाळे,सलाउद्दीन नाकाडे,भिमाशंकर पोहेकर, उपसरचिटणीस अरुण मस्के,बी,एस,काळे,सुरेश फराकटे, राज्य खजिनदार सागर मलगे व अब्दुल सादिक कॉ.जे.एन.बाविस्कर कॉ.पी.वाय पाटील कॉ.संयुक्त सचिव कॉ.विरेंद्रसिंग पाटील, केंद्रीय कार्यकारिणी सदस्य कॉ.देविदास सपकाळे,कॉ.प्रकाश कोळी,कॉ.जितेंद्र अस्वार,कॉ.संध्या पाटील,कॉ.दिनैश बडगुजर,कंत्राटी कामगार सेल,महिला आघाडी पदाधिकारी यांनी एका प्रसिद्धी दिलेल्या पत्रकाद्वारे केले आहे.
आपला विश्वासू
कॉम्रेड कृष्णा भोयर
सरचिटणीस.)