पाचोरा शहर सौर दिव्यांच्या प्रकाशाने उजळणार पाचोर नगरपालिके अंतर्गत तीन कोटी रुपये मंजुर

पाचोरा शहर सौर दिव्यांच्या प्रकाशाने उजळणार
पाचोर नगरपालिके अंतर्गत तीन कोटी रुपये मंजुर

पाचोरा ( वार्ताहर) दि,५
महाराष्ट्र शासना अंतर्गत नगरपरिषदांना देण्यात येणाऱ्या वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी विशेष अनुदान योजनेच्या अनुदानातून पाचोरा नगरपरिषदेस शहरातील विविध भागात सौर दिवे लावण्यासाठी तीन कोटी रुपयांच्या निधीस मंजुरी मिळाली असून यामुळे शहर सौर दिव्यांनी उजळून निघणार आहे. यामुळे पालिकेच्या वीज बिलात देखील बचत होणार असून रात्री अपरात्री अचानक जाणाऱ्या विजेमुळे शहरात अंधार न होता सौर दिव्यांमुळे लखलखाट कायम राहणार आहे.
सदर कामासाठी १०० टक्के हिस्सा राहणार असून त्वरित कामांना सुरुवात करण्यात येणार आहे. हे काम शहरातील तलाठी कॉलॉनो, व्हाआयपी कॉलोनी, जुना अंतुली रोडचा कॉलनी भाग, एम आय डी सी कॉलनी, गाडगेबाबा नगर,भास्कर नगर, विकास कॉलनी, संघवी कॉलनी, बाजोरिया नगर, स्टेट बँक कॉलनी, मानसिंगका कॉलनी, जय किसान कॉलनी, जयराम कॉलनी, प्राध्यापक कॉलनी, दत्त कॉलनी, आनंद नगर, चिंतामणी कॉलनी, जिजामाता कॉलनी,भवरलाल नगर, आशीर्वाद रेसीडनसी, आशीर्वाद कॉटेज, ड्रीम सिटी, गणेश कॉलनी, थेपडे नगर, विवेकानंद नगर, बळीराम पाटील नगर, मिलिंद नगर, हनुमानवाडी, पंपिंग रोड लगतचा कॉलनिभाग, डाक बंगल्या जवळचा कॉलनी भाग, देशमुख वाडी, संभाजी नगर, बाहेरपुरा, आठवडे बाजार, मच्छी बाजार माहिजी रोड भाग श्रीराम चौक रंगार गल्ली गांधी चौक सोनार गल्ली,कोंडवाडा गल्ली, मुल्ला वाडा, बोहरी गल्ली, मुस्लिम वस्ती, दलित वस्ती, कृष्णापुरी, त्रंबक नगर, श्रीराम नगर, सिंधी कॉलनी, जामनेर रोड, शिवाजी नगर, जनता वसाहत, नागसेन नगर, शिवाजी चौक, व शहरातील इतर छोटे मोठे कॉलनी भागात स्ट्रीट लाईट पोल बसविले जाणार आहेत.
सदर निधीच्या मंजुरी साठी आमदार किशोर अप्पा पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार,नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांचे आभार व्यक्त केले असून नगरपालिकेच्या माध्यमातून जास्तीतजास्त चांगल्या सेवा नागरिकांना प्रदान केल्या जात असल्याबद्दल त्यांनी पालिकेच्या कामाचे कौतुक केले आहे दरम्यान नगराध्यक्ष संजय गोहिल यांनी संपूर्ण शहरवासीयांच्या वतीने आमदार किशोर अप्पा पाटील यांचे आभार व्यक्त केले आहेत

कोट :
पाचोरा व भडगाव शहरांच्या सर्वांगीण विकासासाठी शासन स्तरावरून भरघोस निधी कायम मिळवला असून उर्वरित कामांसाठीही निधीची कमतरता भासू देणार नाही.
किशोर अप्पा पाटील
आमदार पाचोरा-भडगाव