पाचोऱ्यात श्री संत शिरोमणी सावता महाराज पुण्यतिथी उत्साहात साजरी

पाचोऱ्यात श्री संत शिरोमणी सावता महाराज पुण्यतिथी उत्साहात साजरी ;पालखी सोहळ्यास अनेक मान्यवरांची उपस्थिती

दि.१६ जुलै २०२३ रोजी पाचोरा शहरात श्री संत सावता महाराज पुण्यतिथी निमित्ताने सालाबाद प्रमाणे क्षत्रिय माळी समाज पंच मंडळ कृष्णापुरीच्या वतीने पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये सकाळी ९ वाजता कोंडवाला गल्ली येथून रंगार गल्ली मार्गी देशमुखवाडी येथे पालखी सोहळ्यात सामील झालेल्या भाविक भक्तांना अल्पोउपहाराची सोय श्री. प्रल्हाद महाजन यांच्या घरी तर चहा पाणी कार्यक्रम चौधरी मेडिकल तसेच पुढे बाहेरपुरा येथे पप्पू महाजन यांच्या घरी नास्ताची सोय करण्यात आली होती.

त्यानंतर पालखी सोहळा कृष्णापुरी मंदिराजवळ आल्यावर तुकाराम बीज समितीच्या वतीने देखील चहा पाणीची सोय केली होती तसेच कृष्णापुरी मार्गी पालखी सोहळा हायवेवरील संजय बाजीराव महाजन पोस्टमन बाबा यांच्या निवास्थानी पालखी सोहळ्यातील भाविकांची यांनी नास्ता व चहा पाण्याची सोय केली होती.
या पालखी सोहळ्यास महिला,पुरुष,जेष्ठ नागरिक तसेच लक्ष्मी माता वारकरी संस्थानचे बाल गोपाल विध्यार्थ्यानी पालखी सोहळ्यास हरी नामाचा गरज करत जय हरी माऊलीचा नाम जपत भजन कीर्तन करीत मिरवणूक पार पाडली आहे. याठिकाणी पाचोरा येथील आमदार किशोर पाटील यांनी भेट दिली असून त्या पाठोपाठ माजी आमदार दिलीप वाघ तसेच ठाकरे गटाच्या नेत्या वैशाली सूर्यवंशी तसेच युवानेते सुमित किशोर पाटील यांनी देखील भेट देऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली आहे. या कार्यक्रमासाठी क्षत्रिय माळी समाज पंच मंडळाचे अध्यक्ष कैलास महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व संचालक मंडळाच्या आजी-माजी सदस्य व सभासदांनी परिश्रम घेतले असून पाचोरा शहरातील तसेच ग्रामीण भागातील माळी समाज त्याच बरोबर बहुजन समाजचे पदाधिकारी तसेच माळी समाज बांधव उपस्थित होते. तर संपूर्ण मिरवणुकी दरम्यान पाचोरा पोलिसांचा चोक बंदोबस्त ठेवण्यात आला होता.