“हर घर झेंडा”हा उपक्रम राबविणे बाबतची जनजागृती होणे कामी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग जळगाव यांचे तर्फे आज सायकल रॅलीचे आयोजन

“हर घर झेंडा”हा उपक्रम राबविणे बाबतची जनजागृती होणे कामी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग जळगाव यांचे तर्फे आज सायकल रॅलीचे आयोजन

भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्ष होत असल्याने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्ताने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग जळगाव युनिटतर्फे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत १३ ऑगष्ट २०२२ ते १५ ऑगष्ट २०२२ या कालावधीमध्ये केंद्र शासनाच्या सूचनेनुसार *हर घर झेंडा* हा उपक्रम राबविणेबाबत व लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे कार्यप्रणाली व भ्रष्टाचाराचे निर्मूलन प्रसाराबाबत दिनांक-07/08/2022 रविवार रोजी सकाळी 06.00 वाजता जळगाव शहरातील *भाऊंचे उद्यान’ काव्यरत्नावली चौक ते मेहरूण तलावपर्यंत सायकल रॅली* काढण्यात आली.

सदर सायकल रॅली मेहरूण तलावाजवळ संपल्यानंतर सदर ठिकाणी लाचलुतपत प्रतिबंधक कायद्याबद्दल व भ्रष्टाचाराविरुद्ध जनजागृती बाबत मा.शशिकांत एस.पाटील,पोलीस उप अधिक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग जळगाव यांनी मार्गदर्शन केले जाईल.
सदर रॅलीमध्ये जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे Dysp श्री.शशिकांत एस.पाटील, PI.संजोग बच्छाव, PI.एन.एन.जाधव व सर्व अंमलदार व रॅलीमध्ये सहभागी असलेले सर्व मित्र परिवार उपस्थित होते. सदरवेळी उपस्थितांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा टोल फ्रि क्रमांक १०६४ व जळगाव कार्यालयाचा संपर्क क्रमांक, इ-मेल आयडी नमुद असलेले हॅण्डविल वाटप करण्यात आले.
Dysp श्री.शशिकांत एस.पाटील,लाचलुचपत प्रतिबंधक विभाग,जळगाव.