Home महाराष्ट्र माळेगाव-ने तालुका शेवगाव येथील पाण्या साठीचे घेराव आंदोलन दुसऱ्या दिवशी लेखी आश्वासना...

माळेगाव-ने तालुका शेवगाव येथील पाण्या साठीचे घेराव आंदोलन दुसऱ्या दिवशी लेखी आश्वासना नंतर स्थगित

माळेगाव-ने तालुका शेवगाव येथील पाण्या साठीचे घेराव आंदोलन दुसऱ्या दिवशी लेखी आश्वासना नंतर स्थगित

दोन बंधाऱ्यात शुक्रवारी पाणी सोडणार असुन उर्वरितसाठी अंदाजपत्रक मंजुरीचा प्रस्ताव १० सप्टेंबर पर्यंत वरिष्ठांकडे सादर करण्याचे प्रशासनाचे आश्वासन.

 

 

(सुनिल नजन “चिफब्युरो” स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा)

माळेगाव, तालुका शेवगाव, जिल्हा अहिल्यानगर येथील पाण्या साठीचे घेराव आंदोलन दुसऱ्या दिवशी प्रशासनाच्या लेखी आश्वासना नंतर स्थगित करण्यात आले आहे.

पाणलोट क्षेत्रातील सात बंधारे,तलाव व नालाबंडिंग वर्षातून सहा वेळा पाण्याने भरून समृद्ध करावेत,या मुख्य मागणीसाठी माळेगाव-ने तालुका शेवगाव,येथील शेतकरी,महिला व युवकांनी ताजनापूर लिफ्ट योजनेच्या पाण्यासाठी सुरू केलेले घेराव आंदोलन दुसऱ्या दिवशी उशिरा प्रशासनाच्या लेखी आश्वासना नंतर मागे न घेता “स्थगित” करण्यात आले आहे.ताजनापूर लिफ्ट योजनेचे आद्य प्रवर्तक ॲडव्होकेट शिवाजीराव काकडे आणि जिल्हा परिषदेच्या महिला आणि बालविकास समितीच्या माजी सभापती सौ हर्षदाताई काकडे यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी दिनांक २४ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळ पासूनच सुरू झालेल्या या आंदोलनात शेतकऱ्यांनी संपूर्ण रात्रभर कार्यालय परिसरातच ठिय्या मांडला होता.त्याच जागेवर स्वयंपाक करून जेवण केले. रात्रभर गौळणी,अभंग, हरिपाठ,आणि भजनाच्या माध्यमातून आंदोलनाची ज्योत कायम तेवत ठेवली गेली.मंगळवार दिनांक २५ ऑगस्ट रोजी सकाळी आंदोलकांनी गांधीवादी भुमिका घेत प्रथम उपविभागीय अधिकारी कार्यालय परिसराची स्वच्छता केली . नंतर प्रशासनाला एक अनोखा व सनदशीर मार्गाने संदेश देत दिवसभर कार्यालय परिसरात ठाण मांडले. दुपारचे जेवण देखील तेथेच करत भजने,अभंग, गौळणी गात प्रशासनाची चांगली करमणूक केली. या आंदोलनास शेतकऱ्यांचा वाढता पाठिंबा आणि आक्रमक पवित्रा पाहून अहिल्यानगर येथून कार्यकारी अभियंता जगदीश पाटील साहेब हे आंदोलनस्थळी पोहचले. आंदोलक आणि प्रशासनांमध्ये काही चर्चेच्या बैठका झाल्यानंतर जलसंपदा विभागाने अखेर प्रशासकीय पातळीवर महत्त्वाचा निर्णय घेतला. त्यानुसार यांत्रिकी विभागाचे अपुर्ण काम पूर्ण करून येत्या शुक्रवारी (२८ ऑगस्ट) पूर्वीच्या मंजुरीतील दोन बंधाऱ्यात पाणी सोडले जाईल आणि उर्वरित पाच पाणलोट क्षेत्राच्या सर्वेक्षण कामासाठी ताजनापूर उपसा सिंचन योजनेतील फेर नियोजनातील शिल्लक पाण्याचा वापर करून अंदाजपत्रक मंजुरीचा प्रस्ताव १० सप्टेंबर २०२६ पर्यंत वरिष्ठ कार्यालया कडे सादर करण्यात येईल असे आश्वासन दिले. सर्वेक्षणाच्या कामाला सक्षम स्तरावरून मंजुरी घेऊन निविदा प्रक्रिया पूर्ण केली जाईल. कार्यारंभ आदेश मिळाल्या नंतरच्या तीन महिन्यांच्या आत हे सर्वेक्षण काम पूर्ण केले जाईल. सदर सर्वेक्षणाचा सविस्तर अहवाल प्राप्त झाल्यानंतर या योजनेचा “डीपीआर” अंतिम मंजुरीसाठी शासनाकडे सादर करण्यात येईल असे लेखी आश्वासन अहिल्यानगर मध्यम प्रकल्प विभागाचे कार्यकारी अभियंता जगदीश पाटील साहेब यांनी दिले.

प्रशासनाकडून निश्चित वेळेची मर्यादा आखून देत लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन पूर्णपणे मागे न घेता केवळ ‘स्थगित’ करत असल्याची घोषणा ॲड.शिवाजीराव काकडे साहेब यांनी आंदोलकांच्या वतीने केली.यावेळी ‘ताजनापूर’चे उपविभागीय अधिकारी श्रीहरी कुलकर्णी, कार्यकारी अभियंता (यांत्रिकी विभाग) दत्तात्रय गुळमकर, उपअभियंता (यांत्रिकी विभाग) अविनाश आव्हाड व इतर कर्मचाऱ्यांसह ज्येष्ठ नेते जगन्नाथ पाटील गावडे,लक्ष्मण गवळी,देविदास गिऱ्हे,भाऊसाहेब सातपुते,अशोक ढाकणे,रामजी पोटफोडे,भारत भालेराव,आणि माळेगाव ने व तालुक्यातील विविध गावातील शेतकरी, महिला व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हे आंदोलन मागे नाही,तर फक्त स्थगित करण्यात आले आहे.

प्रशासनाकडून निश्चित मुदतीचे लेखी आश्वासन मिळाल्यानंतर हे आंदोलन पूर्णपणे मागे न घेता केवळ ‘स्थगित’ करण्यात आले आहे. माळेगावच्या शेवटच्या पाणलोट क्षेत्रात पाणी येई पर्यंत पाठपुरावा करतच राहणार असल्याचे

ॲड.शिवाजीराव काकडे साहेब यांनी सांगितले.

अभी यांत्रिकी विभागाची जोडणी करून ताजनापूर योजनेतून येत्या शुक्रवारी २८ऑगष्ट रोजी पाणी सोडले जाईल मात्र यातुन पूर्वीच्या मंजुरीप्रमाणे दोन बंधारे भरतील. ग्रामस्थांच्या मागणीनुसार उर्वरित पाच बंधारे पाणलोट क्षेत्राला पाणी देण्यासाठी नव्याने सर्वेक्षण करून अंदाजपत्रक मंजुरीसाठी १० सप्टेंबर २०२६ पर्यंतचा अहवाल प्रस्तावा द्वारे वरिष्ठांना सादर केला जाईल. असे अहिल्या नगरच्या मध्यम प्रकल्पाचे

कार्यकारी अभियंता, जगदीश पाटील साहेब यांनी सांगितले.

Don`t copy text!