अमळनेर तालुका : क्विक हील फाउंडेशन (QHF) आणि KBCNMU यांच्या संयुक्त उपक्रमांतर्गत अमळनेर तालुक्यातील दहिवत गावात बचत गटातील महिलांसाठी सायबर जनजागृती उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या Impact Batch उपक्रमादरम्यान महिलांना सायबर फसवणूक कशी होते आणि त्यापासून स्वतःचे संरक्षण कसे करावे, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. OTP, UPI फ्रॉड, बनावट लिंक, फेक कॉल, ऑनलाइन आर्थिक फसवणूक तसेच सोशल मीडिया सुरक्षिततेबाबत महिलांना माहिती देण्यात आली.
महिलांनी कोणत्याही अनोळखी व्यक्तीला OTP, UPI PIN, ATM किंवा बँक खात्याची गोपनीय माहिती देऊ नये, तसेच संशयास्पद लिंकवर क्लिक करू नये, असे आवाहन करण्यात आले. सायबर फसवणूक झाल्यास तात्काळ संबंधित यंत्रणेकडे तक्रार करण्याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले.
या उपक्रमात KBCNMU विद्यार्थी व QHF Warriors तनिषा महाजन आणि तेजस्विनी पाटील, तसेच सहाय्यक दिपाश्री पाटील यांनी बचत गटातील महिलांशी संवाद साधून सायबर सुरक्षेबाबत जनजागृती केली.
महिलांनी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. “सावध रहा, सुरक्षित रहा” हा संदेश देत दहिवत गावात सायबर जनजागृतीचा उपक्रम उत्साहात पार पडला.

















