गोपीचंद पुना पाटील विद्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात संपन्न
कोळगाव, ता. भडगाव (प्रतिनिधी) :- कर्मवीर तात्यासाहेब हरी रावजी पाटील किसान शिक्षण संस्था,भडगाव संचलित गोपीचंद पुना पाटील विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय,कला व विज्ञान महाविद्यालय,न्यू इंग्लिश मेडियम स्कूल,कोळगाव येथे देशाचा ८० वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात व देशभक्तीपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
कार्यक्रमाची सुरुवात संस्थेच्या सचिव डॉ. पुनमताई पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहणाने झाली.ध्वजारोहणानंतर विद्यालयाच्या लेझीम पथकासह स्काऊट-गाईडच्या विद्यार्थी व विद्यार्थिनींनी शिस्तबद्ध पथसंचलन करून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली.या वेळी परिसरात देशभक्तीचा उत्साह संचारला होता.
स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकी व शिस्तीची जाणीव निर्माण करण्यासाठी विविध शपथ देण्यात आल्या. उपशिक्षक सूर्यकांत पाटील यांनी सर्वांना तंबाखूमुक्तीची शपथ दिली,तर प्रा. प्रशांत पाटील यांनी विद्यार्थ्यांना कॉपीमुक्त परीक्षा देण्याची शपथ दिली.
कार्यक्रमास ज्येष्ठ नागरिक युवराज सोनू पाटील, शिवसिंग फुलचंद राजपूत,डॉ.आकाश बाफना, कल्पेश अनिल सोनार,राजेंद्र पंडीत देवरे,अशोक परशुराम माळी,नाना दशरथ पाटील,विद्यालयाचे प्राचार्य आर. आर. वळखंडे,वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य सुरेश कोळी,पर्यवेक्षक बी.डी.साळुंखे, ज्येष्ठ शिक्षक आर ए पाटील,कार्यवाहक एम.ए.पवार यांच्यासह शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस. ए. वाघ यांनी केले. संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण, शिस्तबद्ध आणि देशभक्तीच्या वातावरणात पार पडला.






















