Home महाराष्ट्र पाथर्डीत जादुटोणा विरोधी कायद्याची प्रभावीपणे अंमल बजावणी करण्यासाठी अनिसचे तहसीलदार आणि पोलीसांना...

पाथर्डीत जादुटोणा विरोधी कायद्याची प्रभावीपणे अंमल बजावणी करण्यासाठी अनिसचे तहसीलदार आणि पोलीसांना साकडे?  

पाथर्डीत जादुटोणा विरोधी कायद्याची प्रभावीपणे अंमल बजावणी करण्यासाठी अनिसचे तहसीलदार आणि पोलीसांना साकडे?

 

 

(सुनिल नजन “चिफब्युरो” स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा)

संपूर्ण महाराष्ट्र राज्यात उघडकीस आलेल्या नाशिक जिल्ह्यातील भोंदूगिरी व बुवाबाजीच्या घटनांमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. याच मुद्यावर अहिल्या नगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात चालणाऱ्या अनिष्ट प्रथा, जादूटोणा व लोकांची फसवणूक करणाऱ्या भोंदू बाबांवर कडक कारवाई करण्यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने आता धडाडीचे पाऊल उचलले आहे. सरकारी प्रशासनाने या गुन्हेगारांवर कायद्याचा बडगा निर्माण करावा, या मागणीसाठी निवासी नायब तहसीलदार किशोर सानप साहेब आणि पाथर्डी-शेवगाव विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी निरज राजगुरू साहेब यांना प्रत्यक्ष भेटून हे निवेदन देण्यात आले आहे.

दैवी शक्ती, चमत्कार, ज्योतिष किंवा अध्यात्माच्या नावाखाली भोळ्या भाबड्या समस्येने गांजलेल्या लोकांची आर्थिक फसवणूक करणे, त्यांचा शारीरिक व मानसिक छळ करणे आणि महिलांचे शोषण करणे,अशा प्रकारचे हे गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत.नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील अशोक खरात’ सारखी प्रकरणे पुन्हा घडू नयेत यासाठी प्रशासनाने सतर्क राहुन कारवाई करणे अत्यंत गरजेचे आहे.अशी मागणी अनिस कडून यावेळी करण्यात आली आहे. राशी भविष्य,ज्योतिष किंवा दैवी चमत्काराचा दावा करून जे लोक जनतेची फसवणूक करत आहेत, त्यांचा शोध घेऊन त्यांच्या विरुद्ध जादूटोणा विरोधी कायद्यानुसार तात्काळ गुन्हे (FIR) दाखल करावेत,अशी मागणी निवेदनात स्पष्टपणे करण्यात आली आहे.

हे निवेदन देताना समितीचे अहिल्यानगर जिल्हा पदाधिकारी शशि गायकवाड, पाथर्डी तालुका अध्यक्ष धम्माचार्य वसंतराव बोर्डे, उपाध्यक्ष राजेंद्र सातपुते यांच्यासह साईनाथ बोर्डे, सुभाष गायकवाड,श्रीधर दौंडे,सिद्धार्थ वसंत बोर्डे, पंढरीनाथ कांजवणे,भीमा थोरात आणि म्हातारदेव ढाळे , इंद्रजित शिंदे, बाळासाहेब कांबळे,महादेव गाडे,सतिश गायकवाड,आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. अशा भोंदू बाबांच्या या प्रवृत्तींचा नायनाट करण्यासाठी प्रशासनाने कडक पावले उचलावीत आणि धडाकेबाज कामगिरी करावी असा इशारा प्रशासनाला एका निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.पाथर्डी तालुक्यातील अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे सर्व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

Don`t copy text!