Home पाचोरा किशोर आप्पा पाटील बहुउद्देशीय संस्था संचलित “नर्मदा इंटरनॅशनल स्कूलचा” ज्ञानोत्सव २०२६ या...

किशोर आप्पा पाटील बहुउद्देशीय संस्था संचलित “नर्मदा इंटरनॅशनल स्कूलचा” ज्ञानोत्सव २०२६ या भव्य कार्यक्रममाचे आयोजन

किशोर आप्पा पाटील बहुउद्देशीय संस्था संचलित “नर्मदा इंटरनॅशनल स्कूलचा” ज्ञानोत्सव २०२६ या भव्य कार्यक्रममाचे आयोजन

 

 

 

पाचोरा – मुख्य संपादक प्रमोद बारी 

किशोर आप्पा पाटील बहुउद्देशीय संस्था संचलित नर्मदा इंटरनॅशनल स्कूल (सी.बी.एस.ई. प्रस्तावित), पाचोरा येथे “ज्ञानोत्सव 2026” या भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून शाळेच्या आधुनिक शैक्षणिक सुविधा, दर्जेदार शिक्षणपद्धती व विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या संकल्पनेची माहिती पालक व नागरिकांना दिली जाणार आहे.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मा. श्री. भाऊसो. रणजीतभाई चांडक उपस्थित राहणार असून प्रमुख मार्गदर्शक म्हणून मा. श्री. प्रा. गणेश शिंदे तसेच प्रमुख पाहुणे म्हणून मा. श्री. संजय पाटील (मुंबई) यांची उपस्थिती लाभणार आहे. कार्यक्रमाचे आयोजन व मार्गदर्शन संस्थेचे संचालक श्री. किशोर आप्पा पाटील करीत आहेत.

“ज्ञानोत्सव 2026” अंतर्गत शाळेतील सी.बी.एस.ई. पॅटर्न, कृतीआधारित शिक्षण पद्धती, डिजिटल व स्मार्ट क्लासरूम, एआय व कोडिंग लॅब, सुसज्ज प्रयोगशाळा, अनुभवी व प्रेरणादायी शिक्षकवर्ग, तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रमांची माहिती देण्यात येणार आहे. यासोबतच क्रीडा, व्यक्तिमत्त्व विकास, स्पर्धा परीक्षांची तयारी व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर यावरही विशेष भर दिला जाणार आहे.

नर्सरी ते ७ वी पर्यंत प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून मर्यादित जागा उपलब्ध आहेत. इच्छुक पालकांनी लवकरात लवकर प्रवेशासाठी अर्ज करावा, असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे.

हा कार्यक्रम रविवार, दिनांक २२ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ५.०० वाजता आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमाचे ठिकाण अंतुर्ली फाटा जवळ, भडगाव रोड, पाचोरा, जि. जळगाव येथे आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क : 9044183111, 9044184111

Don`t copy text!