Home महाराष्ट्र दहा हजार पुरण पोळीच्या महा प्रसादाने आखेगाव च्या अखंड हरीनाम सोहळ्याची सांगता

दहा हजार पुरण पोळीच्या महा प्रसादाने आखेगाव च्या अखंड हरीनाम सोहळ्याची सांगता

दहा हजार पुरण पोळीच्या महा प्रसादाने आखेगाव च्या अखंड हरीनाम सोहळ्याची सांगता

 

 

(सुनिल नजन “चिफब्युरो” स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा)

अखंड महाराष्ट्रातील कोणत्याही गावात हरिनाम सप्ताहात पुरण पोळीच्या महाप्रसादाचे आयोजन एखादा अपवाद वगळला तर कधीच केले जात नाही. परंतु अहिल्या नगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील आखेगाव येथे मात्र हा उपक्रम अनेक वर्षांपासून अविरतपणे राबविला जातो. जोग महाराज संस्थानचे महंत ह.भ.प.राम महाराज झिंजुर्के यांच्या मार्गदर्शना खाली दरवर्षी या सोहळ्याचे आयोजन करण्यात येते.या ही वर्षी दिनांक २० ते२६ फेब्रुवारी या काळात हा सोहळा संपन्न झाला. कानिफनाथ महाराज खोलासे यांच्या काल्याच्या किर्तना नंतर या पुरण पोळीच्या महाप्रसादाने या सोहळ्याची सांगता झाली. या पंगती साठी आपल्या घरून १०१ पुरणपोळ्या तयार करून आणलेल्या महिला पैकी कल्पना रामनाथ पायघन, प्रतिक्षा अण्णासाहेब फुलमाळी, अंजनाबाई गोरक्षनाथ झिंजुर्के,मुक्ताबाई कासोळे सोमठाणे,नंदा दिलिप काटे, योगिता बाळासाहेब डोंगरे,कमलबाई तनपुरे,सुनिता काकासाहेब डोंगरे,सुनंदा एकनाथ पायघन,रेखा संदिप साबळे,संगिता शिवाजी शिंदाडे, सुनंदाताई कोल्हे, यांचा पोळ्या लाटल्या बद्दल महाराजांच्या हस्ते संकल्प सन्मान करण्यात आला.या मंदिरात तिन दिवस विधी करून पैठणचे संत एकनाथ महाराज यांच्या मुर्तीची स्थापना करण्यात आली आहे.महंत झिंजुर्के महाराज म्हणजे प्रती तुकाराम महाराज असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.कारण संत तुकाराम महाराज यांच्या काळात त्यांनी जे धार्मिक उपक्रम राबविले होते ते सर्व उपक्रम जोग महाराज संस्थान मध्ये गेल्या पंचवीस वर्षां पासून राबविले जात आहेत.तुकाराम महाराजांची १०० अभंगाची बाळ क्रिडा परंपरा, काल्याचे अभंग, गौळणी,ज्ञानेश्वर महाराज समाधी वरील अभंग,दोन हरीपाठ,काकडा भजन,नित्य नियमाने आळंदी पंढरीची वारी, येथील भाविक भक्त नित्य नियमाने करतात. शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघाच्या भाजपच्या हॅट्ट्रिक आमदार मोनिकाताई राजळे या दरवर्षी या कार्यक्रमास हजर असतात परंतु या वर्षी त्या मुंबई येथे अर्थ संकल्पीय अधिवेशनात उपस्थित असल्यामुळे या सोहळ्यास उपस्थित राहू शकल्या नाहीत. परंतु त्यांच्या गैर हजेरीत त्यांच्या जाऊबाई कासार पिंपळगावच्या माजी सरपंच सौ मोनालीताई राजळे,ग्राम पंचायतीच्या माजी सदस्या योगिता भगत आणि पाथर्डी नगर परिषदेच्या उप नगराध्यक्षा मंगलताई कोकाटे,यांनी या सोहळ्यासाठी हजेरी लावून झिंजुर्के महाराज यांचा सन्मान केला.वरील सप्ताहात सर्व ह.भ.प.विष्णू महाराज जगताप,गोविंद महाराज शिंदे,देविदास महाराज म्हस्के,कृष्णा महाराज चौरे,ज्ञानेश्वर महाराज कुर्हाडे, बाबासाहेब महाराज उखळीकर यांची किर्तने झाली.या सप्ताहात कारभारी बाबुराव पायघन यांनी आचारी कामाची मोफत स्वयंपाक सेवा उपलब्ध करून दिली होती.आखेगाव पंचक्रोशीतील कोरडगाव, सोमठाणे, खरडगाव, बेलगाव,सुसरे, आपेगाव,वडुले बुद्रूक,या गावातून या काल्याच्या पंगतीच्या महाप्रसादा साठी पुरणपोळी, गुळवणी, कुरडया,पापड, भजे,भात, साजुक तूप,हे आवर्जून पाठवण्यात आले होते.अतिशय शिस्त प्रिय नियोजनाने या सोहळ्याची सांगता झाली.

Don`t copy text!