वडुले खुर्द येथे महाशिवरात्री निमित्त त्रिदिनी अखंड हरिनाम सोहळ्याचे आयोजन

(सुनिल नजन “चिफब्युरो” स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा)
श्री हनुमंत राया,वै. वामनभाऊ महाराज,वै. भगवान बाबा,वै.नारायण महाराज आणि कै.शामराव भाउ आव्हाड यांच्या कृपा आशिर्वादाने महाशिवरात्री निमित्त वडुले येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.तिन दिवस चालणाऱ्या या उत्सवात दररोज पहाटे काकडा भजन,दुपारी प्रवचन, सायंकाळी हरीपाठ,रात्री हरी किर्तन,या प्रमाणे रूपरेषा ठरविण्यात आली आहे.शनिवार दिनांक १४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ह.भ.प.सुर्यभान महाराज केसभट यांचे प्रवचन आणि रात्री नागताळा येथिल गणेश गडाचे महंत काशिनाथ महाराज यांचे किर्तन होणार आहे.रविवार दिनांक १५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ह.भ.प. केशव महाराज गुजर आव्हानेकर यांचे प्रवचन होणार आहे.रात्री भगवान गडाचे निवासी ह.भ.प.माउली महाराज शास्त्री यांचे किर्तन होणार आहे.सोमवार दिनांक १६ फेब्रुवारी रोजी सकाळी दहा ते बारा या वेळेत तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ महाराज शास्त्री यांचे काल्याचे किर्तन होउन काल्याच्या महाप्रसादाच्या पंगतीने या सोहळ्याची सांगता होणार आहे.तरी वडुले खुर्द येथील भटणी वस्ती, रणमले वस्ती, जोगेश्वरी वस्ती, गावकरी मंडळी,व भजनी मंडळी यांनी या सोहळ्याचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन समस्त आव्हाड परीवाराच्या वतीने करण्यात आले आहे.
























