Home महाराष्ट्र सोयगाव : घोसला येथील सुपुत्र नगरसेवक विजयेंद्र शिंदे यांचा आज नागरी सत्कार

सोयगाव : घोसला येथील सुपुत्र नगरसेवक विजयेंद्र शिंदे यांचा आज नागरी सत्कार

सोयगाव : घोसला येथील सुपुत्र नगरसेवक विजयेंद्र शिंदे यांचा आज नागरी सत्कार

 

 

सोयगाव, प्रतिनिधी : सोयगाव दत्तात्रय काटोले

तालुक्यातील घोसला येथील सुपुत्र तथा मुंबई महानगरपालिकेच्या वॉर्ड क्रमांक १६१ मधील नवनिर्वाचित नगरसेवक विजयेंद्र (विजू) ओंकार शिंदे यांना ‘मराठा समाजभूषण पुरस्कार २०२६’ प्रदान करण्यात येणार आहे. राजनंदिनी बहुउद्देशीय संस्था यांच्या वतीने हा पुरस्कार जाहीर करण्यात आला असून आज (दि. १४) सायंकाळी ७ वाजता साकीनाका येथील स्वातंत्र्यवीर सावरकरनगर, लिंक रोड परिसरात नागरी सत्कार व पुरस्कार वितरण समारंभ होणार आहे.

शिंदे हे बाळासाहेब ठाकरे यांचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. शिवसेनेत तसेच महानगरपालिकेतील विविध महत्त्वाच्या पदांवर त्यांनी जबाबदाऱ्या यशस्वीपणे सांभाळल्या आहेत. नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीत त्यांनी प्रचंड मताधिक्याने विजय संपादन केला. त्यांच्या सामाजिक व राजकीय क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेत हा सन्मान जाहीर करण्यात आल्याचे संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा संदिपा वाघ व सचिव अमोल पाटील यांनी कळविले आहे.

या सोहळ्यास मान्यवरांसह नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन विजू दादा शिंदे मित्र परिवारातर्फे करण्यात आले आहे.

Don`t copy text!