ईद-ए-मिलादउन्नबी निमित्त शोभायात्राचे करण्यात आले स्वागत

ईद-ए-मिलादउन्नबी निमित्त शोभायात्राचे करण्यात आले स्वागत

पाचोरा:आज पाचोरा येथे पवित्र सण ईद-ए-मिलादउन्नबी अति उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी शहरात तमाम मुस्लिम बांधवांकडून शांतीपूर्ण पद्धतीने शोभायात्रा काढण्यात आली. याप्रसंगी शिवसेना नेत्या सौ. वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांनी उपजिल्हाप्रमुख उद्धव मराठे आणि आपले सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांसोबत शिवतीर्थ शिवसेना मध्यवर्ती कार्यालय, पाचोरा येथे सर्व मुस्लिम बांधवांचे व शोभायात्रेचे मनापासून स्वागत केले. यावेळी वातावरण खूप आनंदमय झालेले होते. याप्रसंगी तालुका प्रमुख शरद पाटील, विनोद बाविस्कर, राजेंद्र राणा, युवा सेना जिल्हा उपप्रमुख संदीप जैन, तालुकाप्रमुख शशी पाटील, युवा सेना शहर प्रमुख मनोज चौधरी, अभिमान पाटील, अरुण तांबे, डी एस पी, प्रेमचंद पाटील, पप्पू जाधव, अभिषेक खंडेलवाल, खंडू सोनवणे, प्यारेलाल चव्हाण, पंकज पाटील, भारत पाटील, पंडित पाटील, धनराज पाटील भिकन दळवी, पुंडलिक जिभाऊ, अर्जुन आनंदा, दिलीप पाटील, पंढरीनाथ पाटील, रवींद्र पाटील, नामदेव चौधरी, गौरव पाटील, प्रकाश भीवसेने, अशोक पाटील, ईश्वर पाटील, संदीप पाटील, युवराज धोबी, नाना वाघ, डीडी नाना, गोकुळ गांगुर्डे, राजेंद्र गायकवाड, धरमसिंग पाटील आणि शुभम राजपूत सह सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.