गो.से.हायस्कूलच्या विद्यार्थ्यांवर बक्षिसांचा वर्षाव तीन दिवसीय ‘कलारंग’ बहरला

गो.से.हायस्कूलच्या विद्यार्थ्यांवर बक्षिसांचा वर्षाव तीन दिवसीय ‘कलारंग’ बहरला

 

 

 

शहर प्रतिनिधी / पाचोरा

७५ वर्ष जुनी असलेल्या पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित श्री. गो. से. हायस्कूल, पाचोरा येथे शालेय वर्धापन दिनानिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही बहरलेल्या ‘कलारंग २०२५–२६’ या बहारदार सांस्कृतिक, शैक्षणिक व कलात्मक उपक्रमात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांवर बक्षीसांचा वर्षाव करण्यात आला.

पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे व्हॉईस चेअरमन नानासाहेब व्ही.टी.जोशी यांचे अध्यक्षतेखाली माजी आमदार आणि संस्थेचे अध्यक्ष दिलीप वाघ यांचे हस्ते पारितोषिक वितरण सोहळा दिमाखात पार पडला.

यावेळी माजी आमदार दिलीप वाघ यांनी विद्यार्थ्यांना पुरस्कार प्रदान करताना संस्थेने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी केलेल्या प्रयत्नांचा आढावा घेताना सांस्कृतिक महोत्सव म्हणजे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळवून देणारे व्यासपीठ असल्याचे सांगताना शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी केलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले तर समारंभाचे अध्यक्ष व्ही टी जोशी यांनी अधिकाधिक विद्यार्थ्यांनी अशा उपक्रमातून मोठा सहभाग नोंदवावा आणि भविष्यातील कलावंत या व्यासपीठावरून निर्माण व्हावेत अशी अपेक्षा व्यक्त केली. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात शाळेचे मुख्याध्यापक एन.आर.पाटील(ठाकरे) यांनी शाळेने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबवलेल्या उपक्रमांचा आढावा घेताना सांस्कृतिक कार्यक्रमातून विद्यार्थ्यांनी विविध कलागुणांमध्ये केलेल्या उत्कृष्ट कामगिरीचा आढावा घेतला. गत शैक्षणिक वर्षात शाळेने आणि शिक्षकांनी विविध स्पर्धांमध्ये मिळवलेल्या यशाचा त्यांनी गौरवपूर्ण उल्लेख केला.

सांस्कृतिक विभाग प्रमुख महेश कौंडिण्य यांनी मनोगत व्यक्त केले.

१ जानेवारी २०२६ ते ३ जानेवारी २०२६ या तीन दिवसांच्या कालावधीत हा कार्यक्रम शाळेच्या प्रांगणात उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीबरोबरच त्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देणे, आत्मविश्वास वाढवणे आणि व्यक्तिमत्त्व विकासाला वाव देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.

यावेळी व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे चेअरमन संजय वाघ,शालेय समितीचे चेअरमन दादासाहेब खलील देशमुख, तांत्रिक विभागाचे चेअरमन वासुदेव महाजन, संचालक भागवत महालपुरे,भूषण वाघ , माजी मुख्याध्यापक सुधीर पाटील,विश्वास साळुंखे,श्री.सु.भा.पाटील विद्या मंदिराच्या मुख्याध्यापिका उज्वला साळुंखे,ओम राठी,रवी अग्रवाल ,नंदू प्रजापत,नंदकुमार कोतकर,आकाश वाघ, शाळेचे मुख्याध्यापक एन. आर. पाटील (ठाकरे),उपमुख्याध्यापक आर. एल. पाटील, सेवानिवृत्त शांताराम चौधरी, पर्यवेक्षिका अंजली गोहिल, पर्यवेक्षक आर. बी. तडवी, पर्यवेक्षक आर. बी. बांठिया,सांस्कृतिक विभाग प्रमुख महेश कौंडीण्य, उपप्रमुख रविंद्र बोरसे, क्रिडा प्रमुख एस. पी. करंदे, किमान कौशल्य विभाग प्रमुख मनीष बाविस्कर, कार्यालयीन अधीक्षक अजय सिनकर आदी मान्यवर उपस्थित होते तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर.बी.बोरसे यांनी केले. या तीन दिवसीय कलारंग उत्सवात सुमारे २५०० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. यावर्षी प्रथमच संस्थेच्या श्री.सु.भा.पाटील प्राथमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांन देखील स्नेहसंमेलनात सहभाग नोंदवला.

*विविध स्पर्धांमधील विजेते पुढील प्रमाणे-*

गीत गायन लहान गट – प्रथम वृंदाविशाल थोरात, द्वितीय आरव सोनवणे, तृतीय देवयानी पाटील, मोठा गट- प्रथम श्रद्धा सोनवणे, द्वितीय कावेरी चौधरी,तृतीय ऋतूपर्ण महाजन, आर्यन तडवी बालनाट्य- प्रथम निषेध अत्याचाराचा, द्वितीय आदर्श गणपती संहार भ्रष्टाचाराचा

एकपात्री स्पर्धा- प्रथम दिव्यराज खैरनार, द्वितीय धवल सूर्यवंशी, तृतीय गौरव धुमाळ आणि देवांश महाजन

सामूहिक नृत्यात पाचवी इ च्या वर्गाने प्रथम क्रमांक पटकावला तर मोठ्या गटातून दहावी ड या वर्गाने प्रथम क्रमांक पटकावला.

फॅन्सी ड्रेस- लहान गट सनी अहिरे, सनी ब्राह्मणे, ईश्वरी पाटील,मोठा गट स्तवन भट ,मानसी पाटील

चित्रकला स्पर्धा

प्रथम- लहान गट- गायत्री राठोड, द्वितीय जान्हवी निकम,तृतीय मानवी चौधरी

मोठा गट – स्वरूप राठोड, पूर्वेश महाजन, सपना पाटील

हस्त कला – लहान गट- जान्हवी पाटील,प्रथमेश घोडके, स्वरा चित्ते

मोठा गट- धनश्री पाटील तेजस्विनी राठोड सपना शिरसाट

रांगोळी लहान गट- ईश्वरी जोशी, सुप्रभा चौधरी, भाविका पाटील मोठा गट- खुशी पाटील,साक्षी पाटील,देवयानी सोनार

विज्ञान प्रदर्शन – लहान गट – तेजोनीधी सावंत, यश पाटील, पंकजा राजपूत

मोठा गट – हर्षल चौधरी, दिनेश चित्ते, आर्यन तडवी

 

गणित प्रदर्शन मोठा गट- आर्य कुमार शेवाळकर, मयूर पाटील,लोकेश पाटील,ललित आंबेकर

 

क्रीडा स्पर्धा

लिंबू चमचा लहान गट- आरुषी धनगर,हेमा राठोड, वैष्णवी पवार

30 मीटर धावणे मुले – अनिकेत मनगटे, रितेश सपकाळे, प्रतीक शेजुळ

संगीत खुर्ची- हेतल सुतार,शिवानी पाटील, सिद्धी सोनवणे

तीन पायांची शर्यत मुले – नील पाटील, सत्यम पाटील, अमोल गवळी, जयेश सुतार,हर्ष राठोड सिद्धेश सोनार

स्लो सायकलिंग लहान गट- चंचल चव्हाण,राधिका हिरे,वृंदा थोरात

100 मीटर धावणे- मुले नकुल पाटील, मोहील ब्राह्मण,तोफिक खान

 

मोठा गट

स्लो सायकली- ऋतुराज पाटील, देवांश महाजन, स्तवन भट

शटल रन- अंकिता चौधरी, खुशी पाटील, वैष्णवी चव्हाण

लिंबू चमचा- जानवी बडगुजर, गायत्री पाटील, कृपाली पाटील

मोठ्या गटातील कबड्डीची स्पर्धा अतिशय रोमांचक ठरली.