Home महाराष्ट्र अखिल भारतीय बारी समाज महासंघाची जालना जिल्हा स्तरीय आढावा बैठक उत्साहात संपन्न

अखिल भारतीय बारी समाज महासंघाची जालना जिल्हा स्तरीय आढावा बैठक उत्साहात संपन्न

अखिल भारतीय बारी समाज महासंघाची जालना जिल्हा स्तरीय आढावा बैठक उत्साहात संपन्न

संत रूपलाल महाराज राष्ट्रीय स्मारक व आर्थिक विकास महामंडळासाठी भरीव आर्थिक निधी महाराष्ट्र शासनाकडे मागणीचे ठराव मंजूर

 

जालना – (प्रतिनिधी- महेंद्र बेराड) दिनांक 10 जून: अखिल भारतीय बारी समाज महासंघ, जालना जिल्हा कार्यकारणीची जिल्हास्तरीय आढावा बैठक आज हॉटेल अतिथी,जालना येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. कार्यक्रमाची सुरुवात संत रुपलाल महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. त्यानंतर प्रमुख पाहुणे, उपस्थित मान्यवर तसेच महासंघाच्या नूतन कार्यकारिणीचा सत्कार करण्यात आला.

 

या बैठकीत राज्यभरातील बारी समाज बांधवांच्या विविध सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक प्रश्नांवर सखोल चर्चा करण्यात आली. विशेषतः संत श्री रूपलाल महाराज राष्ट्रीय स्मारक अंजनगाव सुर्जी जिल्हा अमरावती येथे उभारण्यात येत असलेल्या स्मारकासाठी भरीव निधी उपलब्ध करून देण्याची मागणी तसेच संत श्री रुपलाल महाराज बारी समाज आर्थिक विकास महामंडळास शासनाने भरीव आर्थिक निधी देण्याबाबत महत्त्वपूर्ण चर्चा करण्यात आली. या दोन्ही मागण्यांचे ठराव बैठकीत एकमताने मंजूर करण्यात आले.तसेच जळगाव येथे आयोजित करण्यात येणाऱ्या आगामी काळात दिनांक 07जुलै 2026 रोजी जळगाव येथे होणाऱ्या बारी समाज उद्योग मेळाव्यास समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे,असे आवाहन करण्यात आले.

 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक किरण राजे कोथळकर यांनी केले, तर सूत्रसंचालन राजू कोथलकर यांनी केले. महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष रमेशचंद्र घोलप यांनी समाज संघटन,शिक्षण, बारी समाजाची सद्यस्थिती आणि शासनाचे धोरण या विषयांवर सविस्तर मार्गदर्शन केले. अध्यक्षीय समारोपात बाळासाहेब कोथळकर यांनी बारी समाजातील उद्योग व्यवसाय आणि समाजाची आर्थिक स्थिती याबद्दल मार्गदर्शन करून समाज एकजूट आणि संघटन अधिक मजबूत करण्याचे आवाहन केले. तर आभार प्रदर्शन महेंद्र बेराड यांनी मानले.

 

यावेळी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब कोथळकर, राज्य उपाध्यक्ष हिरालाल शेठ कोथलकर, तुळशीराम पायघन, किरण राजे कोथळकर, प्रकाश पवार, सुखलाल बोडखे,समाधान कोथलकर, राजू कोथलकर, दिलीप बेराड, डीगंबर कतोरे,संजय तेलंग्रे, समाधान तेलंग्रे, संदीप बेराड, प्रकाश शिनकर, रोशन पायघन, अमित बेराड, संपत काटोले, महेंद्र बेराड, सतीश शिनकर, सुनील बेराड, गणेश तेलंग्रे, सागर काटोले, ऋषिकेश तेलंग्रे तसेच हिरालाल तेलंग्रे, देविदास तेलंग्रे योगेश पायघन यांच्यासह अनेक समाज बांधव उपस्थित होते. याचबरोबर वालसावंगी, पिंपळगाव रे, भारज बु.,पारध बु.,सावंगी अ., मासरूळ,धामणगाव, कोसगाव, वालसा वडाळा,पानवडोद आणि जालना शहरातील बारी समाज बांधव मोठ्या संख्येने बैठकीस उपस्थित होते.

Don`t copy text!